उत्तराखंडमध्ये गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू
जिल्हाधिकारी हिमांशु खुराना आणि पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबालही घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरु असून, आणखी लोक यात अडकले आहेत का याचा शोध सुरु आहे.
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये अपघात थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. वाहन दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंडमधील जोशीमठ येथे घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. मयतांमध्ये 10 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
जोशीमठ ब्लॉकचा उगम पल्ला जाखोला मोटर वे वर गाडीवरीव नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली.
अपघातात तीन जण जखमी
जिल्हाधिकारी हिमांशु खुराना आणि पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबालही घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरु असून, आणखी लोक यात अडकले आहेत का याचा शोध सुरु आहे. या अपघातात तीन जण जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरु
चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडली की अन्य कारणामुळे याबाबत पोलीस तपास करत आहेत. सध्या जखमींवर उपचार आणि बचाव कार्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला शोक
अपघाताच्या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन घटनेची माहिती घेतली. तसेचा बचावकार्य युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.