हल्दानी : पत्नीच्या मोबईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तराखंडमधील हल्दानी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. महिलेचे आणि आरोपीचे दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. युनूस असे आरोपी पतीचे नाव आहे, तर सीमा असे मयत पत्नीचे नाव आहे. पत्नी वारंवार मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने युनूसचा सीमावरील संशय बळावला होता. याच संशयातून सीमाचा मोबाईल तपासला असता त्याला मोबाईलवर तिसऱ्याच व्यक्तीने पॉर्न व्हिडिओ पाठवल्याचे आढळले. हा व्हिडिओ पाठवणारा व्यक्ती सीमाचा प्रियकर असल्याचे उघड झाल्यामुळे संतापलेल्या युनुसने सीमाची चाकूने गळा चिरून हत्या केली.
आरोपी युनुसला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने स्वतः पत्नाची हत्या केल्याचे पोलीस जबाब कबूल केले आहे. युनुस हा तांदळाचा व्यापार करायचा. युनूस आणि सीमा दोघांचेही पहिले लग्न झाले होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सीमा हिला पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत.
युनूस आणि सीमाने दुसरा विवाह केल्यानंतर दोघे चॅनेल गेट इंदिरानगर परिसरात भाड्याने राहायचे. सुरुवातीला दोघांचा हा दुसरा संसार सुरळीत सुरू होता. मात्र कालांतराने युनूस याचा पहिल्या पत्नीशी संपर्क सुरू झाला आणि दोघांच्या नात्यात ठिणगी पडली. युनूस आणि सीमा या दोघांमध्ये दररोजची भांडणे व्हायची. याच दरम्यान सीमा ही झाकीर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली.
जाकीर हा आपला भाऊ असल्याचे तिने युनूसला सांगितले होते. मात्र सीमा दररोज मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याचे पाहून युनूसला तिच्यावर संशय आला. याच संशयातून त्याने एक दिवस सीमाचा मोबाईल तपासला, त्यावेळी त्यामध्ये झाकीरने पॉर्न व्हिडिओ पाठवल्याचे युनूसला दिसले. यानंतर संतापलेल्या युनस याने सीमाची गळा चिरून हत्या केली.