वर्धा : रायपूर येथील एका ज्वेलर्सने बैतुल येथे डिलिव्हरी देण्यासाठी आपल्या नोकराकडे पाठविलेल्या 47 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या हिऱ्याच्या अंगठ्या (Diamond Rings) चोरट्याने लांबवल्याची घटना वर्धा येथे घडली आहे. हे दागिने (Jewelery) पारेख डाया ज्वेलर्स यांच्या मालकीचे होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या चोरीचा छडा लावत चोरट्याला अटक केले आणि चोरीला गेलेले लाखोंचे दागिने हस्तगत केले. महेश ऊर्फ सुदाम पांडुरंग गाठेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पुरुषोत्तम यादव असे लुटण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. (In Wardha, a drunken servant was robbed and Rs 47 lakh worth of jewelery was stolen)
रायपूर येथील पारेख डाया ज्वेलर्स येथून 14 आणि 18 कॅरेटच्या सोन्यात डायमंड मढविलेल्या 71 अंगठ्या आणि 82 टॉप्स असे एकूण 47 लाख 82 हजार 319 रुपयांचे दागिने बैतुल मध्य प्रदेश येथे पाठवले होते. हे दागिने वितरित करण्यासाठी प्लास्टिक चौकोनी डब्यात त्याच्या दुकानात काम करणारा पुरुषोत्तम यादव याच्या ताब्यात देऊन रायपूर येथून बैतुल येथे जाण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी रायपूर रेल्वेस्थानकावर सोडून दिले होते. 10 फेब्रुवारी रोजी दुकानातील नोकर पुरुषोत्तम यादव याला सराफा व्यावसायिकाने कॉल केला असता त्याने मी वर्ध्याला आलो आहे, कसा आलो हे माहिती नाही, असे सांगितले. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी पुरुषोत्तम यादव याला पुन्हा फोन करून विचारणा केली असता त्याने दागिने असलेला बॉक्स कुणीतरी चोरुन नेल्याचे सांगितले.
सराफा व्यावसायिक अमित पारेख यांनी वर्धा गाठून याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्याकडे दिली. याचा तपास शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कसोशीने केला असता पोलिसांनी आरोपी सुदाम गाठेकर यास अवघ्या काही तासांतच अटक केली. नोकर पुरुषोत्तम यादव हा वर्ध्यात आला असता त्याने मद्यपान केले होते. दारूच्या नशेत त्याला आरोपी महेश गाठेकर हा भेटला. रेल्वेस्थानक परिसरात दोघांनीही मद्यपान केले आणि दागिने असलेला बॉक्स चोरून नेला. याचा शोध घेण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. कारण त्याच्याजवळ साधा मोबाईल होता. मात्र, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तांत्रिक तपास करून गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. (In Wardha, a drunken servant was robbed and Rs 47 lakh worth of jewelery was stolen)
इतर बातम्या