Wardha Murder : आधी गळा आवळून हत्या, मग पतीचा मृतदेह जाळला; शीर जळाले नाही म्हणून रेल्वे ट्रॅकवर फेकले

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील रेल्वेस्थानक हद्दीत 6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे शीर आढळून आले होते. सुरवातीला रेल्वे पोलिसांनी धड न मिळाल्याने शोध सुरू केला. तपासात ते शीर पुलगाव येथील हिंगणघाटफैल परिसरातील अनिल बेंदले यांचे असल्याचे कळले.

Wardha Murder : आधी गळा आवळून हत्या, मग पतीचा मृतदेह जाळला; शीर जळाले नाही म्हणून रेल्वे ट्रॅकवर फेकले
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 1:05 AM

वर्धा : पती दारु पिऊन रोज भांडण (Dispute) करायचा म्हणून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढल्याची घटना वर्ध्यातील पुलगाव येथे उघडकीस आली आहे. पत्नीने आधी गळा आवळून पतीची हत्या (Murder) केली, मग मृतदेह जाळला. मात्र शीर जळालेच नाही म्हणून रेल्वे ट्रॅकवर टाकले. अनिल मधुकर बेंदले (46) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर मनिषा बेंदले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन पुलगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पत्नीसह अल्पवयीन मुलाला अटक (Arrest) घेतले आहे. पोलिसांनी मलकापूर गाठत फॉरेन्सिक चमूच्या मदतीने मृतदेहाची हाडं जमा केली. आज मृतदेहाची हाडं जमा करुन ती हाडं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनिलला दारुचे व्यसन असल्याने त्याचे रोज पत्नीशी भांडण व्हायचे

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील रेल्वेस्थानक हद्दीत 6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे शीर आढळून आले होते. सुरवातीला रेल्वे पोलिसांनी धड न मिळाल्याने शोध सुरू केला. तपासात ते शीर पुलगाव येथील हिंगणघाटफैल परिसरातील अनिल बेंदले यांचे असल्याचे कळले. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरु केला. यामागचे कारण शोधले तेव्हा पत्नी आणि अल्पवयीन मुलानेच क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले. अनिल हा मूळचा मलकापूर बोदड येथील रहिवासी आहे. मात्र काही दिवसांपासून तो पुलगाव येथे वास्तव्यास होता. त्याचे वृद्ध वडील हे मलकापूर येथे राहत होते. अनिल आधी गृहरक्षक दलात काम करीत होता. गृहरक्षकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला गृहरक्षक दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो मोलमजुरी करीत होता. त्याला दारुचेही व्यसन होते. यामुळे दररोज घरात पत्नीशी खटके उडायचे. त्याला दोन मुलगे असून, एक मुलगा दहावीत शिकत आहे. दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. दररोजच्या उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरातच अनिलची गळा आवळून हत्या केली.

हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन जाळले

हत्या केल्यानंतर रात्रभर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास मलकापूर बोदडसाठी 200 रुपयांत ऑटो केला. ऑटोचालकाला यांच्यासोबत काय सामान आहे, याची कोणतीही कल्पना नव्हती. आरोपी मनिषा आणि तिच्या मुलाने घरातून एक बॅग, मोठी पिशवी आणून ऑटोत ठेवली. चालकाने दोघांनाही अनिलच्या मूळ गावी मलकापूर बोदड येथे त्याच्या वडिलांच्या घरासमोर सोडून दिले. घरातील परिसर मोठा असल्याने मनिषाने त्या पिशव्या एका कोपऱ्यात ठेवल्या. अनिलच्या वडिलांनी विचारणा केली असता जुने कपडे आणल्याचे सांगितले. चक्क वडिलांसमोर पत्नी मनिषा आणि तिच्या मुलाने पोत्यातून अनिलचा मृतदेह त्याच्याच घरापासून काही अंतरावरच जाळला. मात्र, शीर जळाले नसल्याने ते पुलगाव रेल्वेस्थानकसमोरील रेल्वे ट्रॅकवर फेकून देत अपघाताचा बनाव केला. (In Wardha a wife killed her husband with the help of a minor child due to a domestic dispute)

हे सुद्धा वाचा

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.