व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला रेल्वे ट्रॅकला बांधले, जे घडले ते पाहून पोलीसही हैराण

मुखोपाध्याय याने कार्यालयातील एक सहकर्मचारी आणि त्याच्या मित्राकडून 1 लाख 20 रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे फेडल्यानंतरही त्यांनी मुखोपाध्यायकडे व्याजाच्या नावाखाली लाखो रुपये मागितले.

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला रेल्वे ट्रॅकला बांधले, जे घडले ते पाहून पोलीसही हैराण
रील बनवणाऱ्या तरुणांना पद्मावत एक्स्प्रेसची धडकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 5:24 PM

कोलकाता : व्याजाचे पैसे वेळेत दिले नाही म्हणून (Due to non-payment of interest on time) सरकारी कर्मचाऱ्याला (Government Employee) रेल्वे ट्रॅकला बांधल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राममध्ये घडली आहे. यानंतर भरधाव ट्रेनखाली आल्याने तरुणाचा एक पाय कापला गेला आहे, तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रुद्रभैरव मुखोपाध्याय असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर बर्दवान मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुखोपाध्याय याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही हैराण झाले आहे.

काय आहे प्रकरण?

मुखोपाध्याय याने कार्यालयातील एक सहकर्मचारी आणि त्याच्या मित्राकडून 1 लाख 20 रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे फेडल्यानंतरही त्यांनी मुखोपाध्यायकडे व्याजाच्या नावाखाली लाखो रुपये मागितले. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होता.

हे सुद्धा वाचा

याच रागातून गुरुवारी मुखोपाध्याय आपल्या घरी परतत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्याला रस्त्यात अडवले. या दोघांनी मुखोपाध्यायला काहीतरी खायला दिले. हे खाल्ल्यानंतर मुखोपाध्याय बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधले आणि रेल्वे ट्रॅकवर टाकले.

भरधाव रेल्वेने पायावरुन गेल्याने तरुणाचा एक पाय कापला गेला, तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. कटवा पूर्व बर्दवानमधील केतुग्रामच्या शिबलून स्थानकावर अंबलग्राम रेल्वे मार्गावरील अझीमगंज मार्गावर ही घटना घडली.

जीआरपी आणि पोलिसांकडून सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडित तरुणाने पोलीस जबाबात सर्व घटना सांगितली असली तरी त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.