यवतमाळमध्ये माजी सैनिकाला गंडवले, बनावट सोने देऊन 10 लाखांचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळमध्ये माजी सैनिकाला एक किलो बनावट सोने देऊन 10 लाखात गंडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळ येथील आर्णी नाका परिसरात घडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ : माजी सैनिकाला (Ex-servicema) एक किलो बनावट सोने (Fake Gold) देऊन 10 लाखात (10 lakh cash) गंडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) येथील आर्णी नाका परिसरात घडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख दाऊद शेख कालू (वय 44) असं फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचं नाव असून ते आर्णी येथील रहिवासी आहेत. तर विनोद प्रजापती याच्यासह अन्य दोघांनी त्यांच्याकडे एक किलो सोने असून ते पंधरा लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात येईल, असं सांगतील. माजी सैनिक शेख दाऊद शेख कालू यांनी देखील त्यांच्यावर विश्वासात ठेवला. माजी सैनिक शेख यांच्याकडे दहा लाख रुपये असल्याने त्या रकमेत त्यांनी सौदा केला. यानंतर माजी सैनिकाने ते सोने सराफाला दाखविले. यावेळी ते सोने बनावट असल्याचे सिद्ध झाले आणि माजी सैनिकाची फसवणूक झाली. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
बनावट सोन्याचे यापूर्वीही प्रकार
बनावट सोने देऊन पैसे उकळण्याचे यापूर्वी देखील अनेक प्रकार झाले आहेत. राज्यात अशा टोळ्या सक्रीय असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. असाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आला होता. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे अशा प्रकारची फसवणूक रोखली जाऊ शकते. यवतमाळमधील या धक्कादायक प्रकारामुळे माजी सैनिक शेख यांचं मोठं नुकसान झालं आहे.
तिघांचा शोध सुरू
यवतमाळमधील शेख दाऊद शेख कालू या माजी सैनिकाची फसवणूक करणाऱ्या त्या तिघांचा शोध घेणं पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी शेख दाऊद यांनी अवधूतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता अशा प्रकारचे यवतमाळमध्ये रॅकेट तर नाही ना, याचाही शोध घ्यायला हवा.
इतर बातम्या