मामेभावाने आतेभावाला ‘या’ कारणावरुन चाकूने भोसकलं, कारणं ऐकून तुम्हाला धक्काच बसेल, सीसीटीव्ही आलं समोर
नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून सीसीटीव्ही घटना कैद झाली आहे.
नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चाकू हल्ल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. ही चाकू हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामेभाऊ आणि बहिणीकडे पैसे मागितल्याचा राग मनात धरून जेलरोड भागात आते भावाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरातील विपुल बागुल हे रात्री शतपावली करत त्यांच्यावर हल्ला झाला आहे. अचानक त्यांचा मामेभाऊ निखिल मोरे आणि त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी विपुलवर चाकूने वार केले आहे. याशिवाय एका हॉटेलवर दगडफेक केली आहे. या घटणेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहे. उपनगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी युवकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
विपुल बागूल यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
जखमी विपुल बागुल याने आपला मामेभाऊ निखिल मोरे यांच्या वाहनांच्या कर्जाचे हप्ते भरले होते, त्या पैशांची मागणी विपुल याने केली होती.
निखिल मोरे आणि त्याच्या बहिणीकडे विपुलने पैशाची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन चाकूने हल्ला केला आहे.
पैसे मागितल्याने मामेभावाकडून आतेभावावर चाकू हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद #nashik #crime #police #CCTV pic.twitter.com/ZZaDtbSOgd
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) January 25, 2023
नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहे. सर्रासपणे कोयते, चाकू आणि पिस्तूलचा वापर होत असल्याने नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्षुल्लक कारणावरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती, त्यातील आरोपीही अल्पवयीन आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये सर्रासपने खून आणि हल्ल्याच्या घटना घडत आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे पोलीसांनी कठोर पाऊले उचलून गुन्हेगारांना धडा शिकवणे गरजेचे आहे.