सावधान! सोनसाखळी चोरीचा नवा फंडा…अशी होतेय सोनसाखळी चोरी…
नाशिकच्या पंचकृष्णा लॉन्सजवळील ज्ञानेश्वरी सोसायटी येथील राधिका मनसुरे यांनी सोनसाखळी ओरबडल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नाशिक : सोनसाखळी ओरबडण्याच्या घटना नागरिकांना तश्या नवीन नाहीत. दिवसेंदिवस कुठल्या ना कुठल्या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना घडतच असतात. त्यातच नाशिक शहरात (Nashik Cirty) घडलेली सोनसाखळी (Chainsnaching) ओरबडण्याची घटना पोलिसांची (Nashik Police) डोकेदुखी वाढवणारी आहे. तसे चोरटे हे चोरी करतांना नवनवीन पॅटर्न अमलात आणून चोऱ्या करत असतात. त्यातच आता नाशिकमध्ये घडलेल्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटना पाहता सोनसाखळी ओरबडण्यात महिलांचा समावेश असल्याचे तक्रारीवरुन आढळून आले आहे. यामध्ये दुचाकी चालवणारा पुरुष असून पाठीमागे बसलेली महिला सोनसाखळी ओरबडण्याचे काम करीत येते. त्यामुळे महिला पुरूषांचे जोडपे सक्रिय असल्याचा पोलीसांना संशय असून या घटनांचा तपास सुरू आहे.
नाशिकच्या पंचकृष्णा लॉन्सजवळील ज्ञानेश्वरी सोसायटी येथील राधिका मनसुरे यांनी सोनसाखळी ओरबडल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राधिका या पल्या मुलीला सायंकाळच्या वेळी शिकवणीसाठी घेऊन जात होत्या, त्या पायी असतांना दुचाकीवर एक जोडपे आले आणि राधिका यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडत घेऊन गेले.
राधिका पायी चालत होत्या त्यावेळी जवळ आलेल्या दुचाकीवर पुरुष हा दुचाकी चालवत होता तर महिला ही पाठीमागे बसलेली होती. महिलेने उतरून मंगळसूत्र ओरबाडले आहे.
अशीच काहीशी घटना नाशिकच्या मंगला प्रकाश जंजाळकर यांच्याबाबत घडली आहे. त्यात त्यांनी दोघांशी प्रतिकार केल्याने त्यांची सोनसाखळी गेली नाही.
जंजाळकर यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने भामट्या जोडप्याने धूम ठोकली असली तरी पोलीस त्यांच्या मागावर असुन शोध सुरू आहे.
नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना पोलिसांची चिंता वाढवणारी असून या घटनेची मोठी चर्चा आहे.