Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पीएफआय’ सदस्यांच्या एटीएस कोठडीत वाढ; चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी पाचही आरोपींची 8 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी केली आहे. पाचही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे.

'पीएफआय' सदस्यांच्या एटीएस कोठडीत वाढ; चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 11:32 PM

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या कनेक्शनवरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या महिन्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात देशभरात छापेमारी (NIA raid against Popular Front of India) केली. त्यादरम्यान महाराष्ट्रातूनही 20 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना महाराष्ट्र एटीएसने अटक (Arrest Maharashtra ATS) केली होती. त्या पाच संशयित दहशतवाद्यांना सोमवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) हजर करण्यात आले. त्यांच्या एटीएस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

अल कायदा, इसिसशी संबंध असल्याचा संशय

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी पाचही आरोपींची 8 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी केली आहे. पाचही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे.

अटक आरोपींचा अल कायदा, इसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने सध्या महाराष्ट्र एटीएसकडून अधिक तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मिडीयातील अॅक्टीव्हीटींची चौकशी

आरोपींच्या सोशल मीडियातील अॅक्टिव्हिटी तसेच त्यांच्या बँक खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करणे गरजेचे आहे. यासाठी आरोपींची आणखी कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने सोमवारच्या सुनावणीदरम्यान केला.

यावेळी सरकारी वकिलांनी आठ दिवसांची कोठडी मागितली. तथापि, बचाव पक्षाने त्यावर घेतलेला आक्षेप लक्षात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी पाचही आरोपींना आणखी पाच दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.

आरोपींच्या घरातून सीडी, पुस्तके, मोबाईल जप्त

मागील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र एटीएसने आरोपींच्या घर कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या सीडी, मोबाईल तसेच इतर आक्षेपार्ह पुस्तकांची माहिती दिली होती. त्याचवेळी विविध खळबळजनक आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांची अद्याप चौकशी केली जात आहे.

एटीएसने 22 सप्टेंबरला पाचही आरोपींना अटक केली होती. आरोपींविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपींमध्ये वकिलाचा समावेश

आरोपींमध्ये एका वकिलाचा समावेश आहे. त्या वकिलाने अन्य आरोपींना 2013 पासून कायदेविषयक साहाय्य केले तसेच दहशतवादी कारवाया संबंधित संशोधन केल्याचाही आरोप आहे. त्याच्याकडे काही आक्षेपार्ह पुस्तके सापडली असल्याचा दावा एटीएसने मागील सुनावणीमध्ये केला होता.

पीएफआयविरोधात देशभरात धडक कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या महिन्यात पीएफआयविरोधात संपूर्ण देशभरात धडक कारवाई केली होती. या मोहिमेमध्ये अन्य तपास यंत्रणांनीही मदत केली.

एकाचवेळी पंधरा राज्यांमध्ये करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान जवळपास 106 पीएफआय सदस्यांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकमधून प्रत्येकी 20 जणांना ताब्यात घेतले होते.

लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.