Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या घराबाहेरील ‘ती’ पांढरी इनोव्हा मुंबई पोलिसांची; सूत्रांची खळबळजनक माहिती

ही इनोव्हा कार CIU युनिटच्या आणखी काही अधिकाऱ्यांनीही वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. | Sachin Waze Innova car

अंबानींच्या घराबाहेरील 'ती' पांढरी इनोव्हा मुंबई पोलिसांची; सूत्रांची खळबळजनक माहिती
सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या CIU युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांची NIAकडून रविवारी सकाळी चौकशी करण्यात आली. यावेळी ही माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 1:03 PM

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या (CIU) असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली. सचिन वाझे यांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर NIA ने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली. (Innova car outside ambani residence in CCTV footage belongs to CIU unit of Mumbai Police)

तसेच ही इनोव्हा कार CIU युनिटच्या आणखी काही अधिकाऱ्यांनीही वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या CIU युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांची NIAकडून रविवारी सकाळी चौकशी करण्यात आली. यावेळी ही माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय, अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ कारही पोलिसांचीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हीच स्कॉर्पिओ गाडी अन्वय नाईक प्रकरणातील आरोपी अर्णव गोस्वामी यांना अटक करताना वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यावेळी या गाडीवर बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या नव्या माहितीमुळे आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणातील संशयाचे धुके आणखी वाढले आहे.

‘ती स्कॉर्पिओ कार 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझेंकडे होती’

हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला काही दिवसांपूर्वी  जबाब दिला आहे. त्यात अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ही हिरेन यांची असून ही कार नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वाझे वापरत होते, असं म्हटलं आहे. वाझे हे हिरेन यांना ओळखत नाहीत तर त्यांच्याकडे ही कार कशी आली? असा सवाल भाजपने उपस्थित केला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.

संबंधित बातम्या:

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

(Innova car outside ambani residence in CCTV footage belongs to CIU unit of Mumbai Police)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.