चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त, 100 दिवसांत 5 कोटींचा मुद्देमाल आणि 500 गुन्हे दाखल, कृष्णप्रकाश यांचा दणका!

अवैध धंद्यांवर जरब बसावी म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना करुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. | IPS krushna prakash

चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त, 100 दिवसांत 5 कोटींचा मुद्देमाल आणि 500 गुन्हे दाखल, कृष्णप्रकाश यांचा दणका!
IPS krushna Prakash
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 12:21 PM

पुणे : पुण्याजवळच्या चाकणमध्ये विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गुटखा सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून पकडला. चाकण येथे ही कारवाई करण्यात आली. यात 1 लाख 55 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दिनेश सोळंके याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (IPS krushna prakash Campign Against illegal Business)

आरोपी दिनेश याचे कडाचीवाडी येथे केतन किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला होता. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी पोलिसांनी दुकानातून 1 लाख 55 हजार 388 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अवैध व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश इन अ‌ॅक्शन मोड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि आयुक्तालयाच्या अंतर्गत येणारा काही ग्रामीण भागात अवैध धंद्यांचे मोठे पेव फुटले होते. त्यावर जरब बसावी म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना करुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये गुटखा विक्री, अवैध दारु विक्री, जुगार, मटका, भेसळयुक्त ऑईल, अनैतिक देहव्यापार, गांजा बाळगणे अशा तब्बल 119 केस सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आल्या आहेत. तर 500 पेक्षा अधिक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाठीमागील 100 दिवसांमध्ये केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे आणि त्यांच्या टीमने केली आहे.

(IPS krushna prakash Campign Against illegal Business)

हे ही वाचा :

Busपिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा प्रवास आता मीटरनुसार, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून मीटर डाऊन!

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

दिशासोबत जे झालं तेच पूजासोबत होणार असेल तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय?; नितेश राणे संतापले

Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.