मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. (Rashmi Shukla summoned Phone Tapping)

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स
IPS अधिकारी रश्मी शुक्ला
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 7:36 AM

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. (IPS Officer Rashmi Shukla summoned in alleged Maharashtra Ministers Phone Tapping Case)

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले. बुधवार 28 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती माहिती आहे.

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

हेही वाचा :

अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप

रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

(IPS Officer Rashmi Shukla summoned in alleged Maharashtra Ministers Phone Tapping Case)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.