NIA Detained : कोल्हापूरमध्ये एनआयएनं ताब्यात घेतलेल्या इर्शाद शेखच्या कार्यालयाची तोडफोड
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगवलं. मात्र इर्शादला नेमकं कुणी अटक केली याबाबत कोणतीच माहिती नाही.
कोल्हापूर : कोल्हापूरमधील हुपरी रेंदाळमध्ये आज दुपारी NIA ने छापा टाकत लबैक इमदाद फाऊंडेशनचा अध्यक्ष इर्शाद शेख (Irshad Shaikh)सह त्याचा भाऊ अल्ताब शेखला ताब्यात घेतले आहे. इर्शादला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक जमावाने इर्शाद शेखच्या कार्यालायाची तोडफोड (Vandalized) केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगवलं. इसिस (ISIS)शी संबंधित असल्याच्या संशयातून एनआयने इर्शाद शेख आणि अल्ताब शेखला एनआयएने त्यांची राहत्या घरी चौकशी करत त्यांना ताब्यात घेतले. इसिसशी संबधित प्रकरणावरुन देशभरातील 6 राज्यातील 13 ठिकाणी एनआयएने आज कारवाई केली. यापैकी महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नांदेडमध्ये कारवाई केली.
सामाजिक संस्थेच्या आड इसिससाठी काम करत असल्याच्या संशयातून कारवाई
एनआयएने संशयित म्हणून ताब्यात घेतलेला इर्शाद शेख याचा चांदीचे टाक बनविण्याचा व्यवसाय आहे. तसेच तो लबैक इमदाद फाऊंडेशन नावाने एक सामाजिक संस्थाही चालवतो. या संस्थेच्या माध्यमातून अपंग आणि गरजू लोकांना मदत देण्याचे काम करतो. मात्र समाजसेवेच्या आड ही संस्था इसिससाठी काम करत असल्याचा संशय एनआयएला होता. त्यामुळे एनआयएने आज पहाटे इर्शाद शेख याच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर राहत्या घरी इर्शादची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर इर्शाद आणि त्याचा भाऊ अल्ताब या दोघांना एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएकडून दोघांची आणखी चौकशी सुरु आहे. अद्याप अटकेची कारवाई केली नाही.
एनआयएने नांदेडमध्ये छापेमारी करत तिघांना ताब्यात घेतले
एनआयएने आज नांदेड शहरामध्ये छापेमारी करत तीन जणांना ताब्यात घेतले. आज पहाटे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या तिघांचीही सुटका करण्यात आली. एका व्हाट्स अँप ग्रुपवर नांदेड येथील एका युवकाने चॅटिग केली होती. त्यात काही अरबी वाक्याचा अर्थ त्याने उर्दूमध्ये सांगितला होता. या ग्रुपमध्ये काही संशयित होत असल्याचा संशय एनआयएला होता. त्यावरुन नांदेडच्या युवकांची चौकशी करण्यात आली. चौकशीत काही निष्पन्न न झाल्याने त्या तिघांची सुटका करण्यात आली. (Irshad Shaikhs office taken into custody by NIA was vandalized in Kolhapur)