Isis Suspect Arrested : आजमगढमधून ISIS चा संशयित ताब्यात, कोणत्या तारखेला होता स्फोटाचा प्लॅन? यूपीमध्ये नेमकं काय घडलं?

मोबाईल डेटाचा शोध घेतल्यानंतर संशयिताचा AL-SAQR MEDIA या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने मुस्लिम तरुणांना दहशतवादी आणि जिहादसाठी ब्रेनवॉश करण्यासाठी तयार केलेल्या टेलिग्राम चॅनेलशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

Isis Suspect Arrested : आजमगढमधून ISIS चा संशयित ताब्यात, कोणत्या तारखेला होता स्फोटाचा प्लॅन? यूपीमध्ये नेमकं काय घडलं?
आजमगढमधून ISIS चा संशयित ताब्यात, कोणत्या तारखेला होता स्फोटाचा प्लॅन? यूपीमध्ये नेमकं काय घडलं?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:57 PM

उत्तर प्रदेश : देशात स्वातंत्र्य दिनापूर्वी (Independence Day) स्फोटाचा (Bomb blast) कट रचणाऱ्या ISIS च्या एका संशयिताला (Terrorist) उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने आझमगड येथून अटक केली आहे. सबाउद्दीन आझमी असे संशयिताचे नाव असून तो आयएसआयएसमध्ये भरती करणाऱ्यांच्या थेट संपर्कात होता. यूपी एटीएसने त्या संशयिताकडून आयईडी बॉम्ब बनवण्याचे साहित्यही जप्त केले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला एटीएसच्या मुख्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. मोबाईल डेटाचा शोध घेतल्यानंतर संशयिताचा AL-SAQR MEDIA या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने मुस्लिम तरुणांना दहशतवादी आणि जिहादसाठी ब्रेनवॉश करण्यासाठी तयार केलेल्या टेलिग्राम चॅनेलशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सध्या आरोपी सबाउद्दीन हा AIMIM चा सदस्य आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

कसा तपास लागला?

यूपी एटीएससाठी हे मोठे यश मानले जात आहे. स्वातंत्र्य दिनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, एटीएस पोलीस महासंचालक, यूपी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था यांच्या देखरेखीखाली सतत कट्टरपंथी घटकांवर लक्ष ठेवून आहे. यूपी एटीएसला एका एजन्सीकडून माहिती मिळाली होती की आझमगढमधील अमिल्लो मुबारकपूरमधील एक व्यक्ती, त्याच्या साथीदारांद्वारे ISIS विचारसरणीने प्रभावित, व्हॉट्सअॅप आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया अॅप्सद्वारे जिहादी विचारसरणीचा प्रसार करत होता. तो लोकांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता, असा आरोप आहे.

कारवाईचा बदला घेण्याचा प्लॅन

बिलाल नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर संपर्क साधल्यानंतर बिलाल सबाउद्दीनशी जिहाद आणि काश्मीरमधील मुजाहिदांवर कारवाईबद्दल बोलायचा. चर्चेतच बिलालने मुसा उर्फ ​​खट्टाब कश्मीरीचा नंबर दिला जो इसिसचा दहशतवादी आहे, त्यामुळे आरोपी आणि तो बोलू लागले. काश्मीरमधील मुजाहिदांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याच्या योजनेच्या अनुषंगाने मुसाने सध्या सीरियात असलेल्या इसिसच्या अबू बकर अल-शमीचा नंबर दिला. अबू बकर अल-शमीच्या संपर्कात आल्यानंतर सबाउद्दीनने मुजाहिदांवर होत असलेल्या कारवाईचा बदला घेण्याचा त्यांचा प्लॅन होता.

बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण सुरू होतं

शमीने सबाउद्दीनला आयईडी बनवण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे साहित्य सांगितले. सबाउद्दीनचा आयएसआयएसमध्ये भर्ती करणारा अबू उमर यानेही संपर्क साधला होता. अबू उमरने सोशल मीडिया अॅप्सद्वारे हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयडी बनवण्याचे प्रशिक्षण सुरू केले होते. इतकेच नाही तर मुजाहिदीनने भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या आणि भारतात इस्लामिक शासन आणि शरिया कायदा लागू करण्याच्या प्लॅनवर काम सुरू केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.