‘डीआरडीओ’वर कुणाच्या ड्रोनच्या घिरट्या, ड्रोनची घेतली गंभीर दखल

याच क्षेत्रात म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल आणि डीआरडीओ या दोन्ही ठिकाणी महिनाभरातच ड्रोन आकाशात घिरट्या घालतांना दिसून आला आहे.

'डीआरडीओ'वर कुणाच्या ड्रोनच्या घिरट्या, ड्रोनची घेतली गंभीर दखल
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 4:42 PM

नाशिक : नाशिकमधील डीआरडीओच्या (DRDO) संरक्षक भिंतीजवळ ड्रोनने (Drone) घिरट्या घातल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे दुसऱ्यांदा ही घटना घडल्याचे समोर आल्याने याबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे. लष्करी आस्थापनांच्या हद्दीत अवघ्या महिनाभरात दोनदा ड्रोनने घिरट्या घातल्याने नाशिक पोलिसांसह (Nashik Police) लष्कर विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याशी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी, लष्कर आस्थापनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाणार आहे. एकूणच लष्कर आस्थापना असलेल्या डीआरडीओच्या बाबतीत दोनदा हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी लष्करी यंत्रणांचे तळ असल्याने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून नाशिक जिल्हा आहे. त्यामुळे शहर हद्दीत जवळपास 16 नो फ्लाइंग झोन आहेत.

याच क्षेत्रात म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल आणि डीआरडीओ या दोन्ही ठिकाणी महिनाभरातच ड्रोन आकाशात घिरट्या घालतांना दिसून आला आहे.

डीआरडीओच्या संरक्षक भिंतीजवळ घिरट्या घालत असलेल्या ड्रोनची माहिती एका शेतकऱ्याने डीआरडीओच्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी खात्री पटवून घेत आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीवरून आडगाव पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला असून तपासात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.

एकूणच या घटनांनी सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला असून लष्कर अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस आयुक्त पुढील कारवाई करणार आहेत.

दरम्यान, दोन्ही घटना घडल्यानंतर एक ते दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ड्रोनचा आकार, रंग, कोणत्या दिशेने ड्रोन आला, याबाबत काहीही एक ठोस माहिती हाती लागत नसल्याने तपासाचे मोठे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.