आर्थिक गंडा घालण्याचा नवा फंडा, धुळ्यातील टोळीनं कुणा-कुणाला लावलाय चुना, जाणून घ्या…
मिना सुरेश जगताप यांना त्यांच्या ओळखीतील व्यक्तीने संपर्क साधला होता. तुमच्या मुलास सरकारी नोकरीला लावायचे असल्यास आपल्या ओळखीत एक व्यक्ती असल्याचे सांगितले होते.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात ( Nashik News ) नोकरीला लावून देतो म्हणून फसवणूक ( Fraud ) करणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा होती. मात्र, ती चर्चा अखेर खरी ठरली आहे. सरकारी विभागात नोकरीला लावून देतो असं सांगत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात ( Nashik Crime News ) याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागात नोकरीला लावून देतो म्हणत एका महिलेला लाखों रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये ही टोळी धुळे येथील असून त्यांचा शोध नाशिक पोलिसांकडून घेतला जात आहे.
नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मिना सुरेश जगताप यांची तीन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये तक्रारदार महिलेच्या मुलाला समाज ककल्याण विभागात नोकरीला लावून देतो असे सांगण्यात आले होते.
मिना सुरेश जगताप यांना त्यांच्या ओळखीतील व्यक्तीने संपर्क साधला होता. तुमच्या मुलास सरकारी नोकरीला लावायचे असल्यास आपल्या ओळखीत एक व्यक्ती असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार महिलेच्या घरी आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी आली होती. यामध्ये त्यानुसार ठरल्याप्रमाणे महिलेने वेळोवेळी पैसे दिले. मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने महिलेने ज्यांना पैसे दिले त्यांच्याशी संपर्क सुरू केला.
मात्र, महिलेला पैसे देण्यात कुणीही तयार होत नव्हते, त्यात मुलाला नोकरीही लागत नसल्याने महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. त्यावरून धुळे जिल्ह्यातील चौघांच्या विरोधात सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात भूषण पाटील-देवरे, किरण पवार, गणेश भावसार आणि योगेश गायकवाड यांच्या नावाचा समावेश असून जवळपास साडेतीन लाख रुपये महिलेने वेळोवेळी दिले असून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वर्षभराच्या आतच ऑर्डर येईल असे सांगत धुळ्याहून नाशिकमध्ये या चौघांनी महिलेची फसवणूक केली आहे. त्यामध्ये महिलेने पैशाचा तगादा लावल्याने फसवणूक करणाऱ्यांनी धमकीही दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी नाशिक शहरात सरकारी नोकरीला लागायचे असल्यास सेटिंग असल्याची चर्चा होती. यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याची माहीत हळूहळू समोर येत आहे. त्यामध्ये बदनामीच्या भीतीपोटी अनेकांनी तक्रार देणं टाळलं आहे.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एक-दोन व्यक्तींचे नावं सांगून त्यांना आम्हीच नोकरीला लावल्याचे सांगितले जातं. त्यामध्ये विश्वास संपादन करून आर्थिक गंडा घातला जात आहे. सातपुर मधून हे पाहिलं प्रकरण समोर आले आहे.