हे पाहा लग्न जमत नसल्यानं तरूणानं काय केलं? थेट गॅस सिलेंडरची नळी कापली आणि…
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई गावतील ही घटना आहे. आराई येथील अंकुश पवार या तरुणाने हे कृत्य केले आहे. यामध्ये लग्न जमत नाही म्हणून त्याने हा संताप व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
नाशिक : अलीकडच्या काळात संताप व्यक्त झाल्यानं कोण काय करेल याचा काही नेम नसतो. त्यामध्ये जर मद्यपान (Alcoholic) किंवा कुठली नशा केली असेल तर मग विचारण्याची कुठली सोयच राहत नाही. त्यामध्ये काही कारणं ही चर्चेचा विषय ठरत असतात. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला (Nashik News Crime) आहे. त्याची चर्चा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात होऊ लागली आहे. लग्न (Marriage) जमत नाही म्हणून घरातच राडा केला आहे. तो तरुण इथवरच नाही थांबला त्याने थेट घरालाच आग लावत आपल्या जन्म दात्या आईलाच मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पंचक्रोशीत ही घटना समजतात मद्यपी तरुणाच्या या कृत्याची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई गावतील ही घटना आहे. आराई येथील अंकुश पवार या तरुणाने हे कृत्य केले आहे. यामध्ये लग्न जमत नाही म्हणून त्याने हा संताप व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
लग्न जमत नाही, त्यामुळे अंकुश पवार हा मद्यपान करू लागला होता. त्यामध्ये अंकुश पवार दोन दिवसांपूर्वी मद्यपान करून घरी आला होता. लग्नावरून आईशी वाद घालत होता.
लग्नाच्या विषयावरुन आई बेबीबाई पवार यांनी यांनी अंकुश पवार यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अंकुश ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता, त्यामुळे अंकुशने वाद घालण्यास सुरुवात केली.
माझं लग्न का करत नाही म्हणून आईशी वाद घालत असतांना अंकुश पवार याने घरातील गॅस सिलेंडरची नळी कापली आणि आग लावून घरच पेटवून दिले, यामध्ये आई अंकुशला रोखण्याचा प्रयत्न करत होती.
अंकुशने यावेळी आई आग लावण्यापासून अडवत असतांना थेट मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, तो पर्यन्त घराला आग लागली होती.
नागरिकांनी आग विझवण्यास सुरुवात केली, मात्र तोपर्यन्त घरातील संसारउपयोगी वस्तु, कागदपत्रे आणि इतर वस्तु जळून खाक झाल्या होत्या, यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
आजूबाजूच्या नागरिकांनी बागलाण पोलीसांना ही बाब कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अंकुशच्या आई बेबीबाई पवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश पवार याने केलेल्या कृत्याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होऊ लागली आहे. त्यामध्ये अंकुशच्या या कृत्यावर नागरिक संतापही व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे अंकुशवर कठोर कारवाई व्हायला हवी अशीही चर्चा नागरिक करत आहे.