IT Raid : वऱ्हाडी म्हणून गेले, वरात काढून आले, राहुल-अंजलीच्या लग्न मुहूर्तावर जालन्यात धाड! आयकराच्या छापेमारीचा कोडवर्डही समोर

IT Raid : लोकांना वाटलं ही फौज तर वऱ्हाड्यांची आहे. पण वरात आयकर विभागाचे अधिकारी काढणार आहे, याची पुसटशीही कल्पना तेव्हा कुणाला आलेली नव्हती.

IT Raid : वऱ्हाडी म्हणून गेले, वरात काढून आले, राहुल-अंजलीच्या लग्न मुहूर्तावर जालन्यात धाड! आयकराच्या छापेमारीचा कोडवर्डही समोर
अनोखी शक्कल...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:37 AM

जालना : जालन्यात (Jalna Crime News) आयकराच्या छापेमारीमध्ये स्टिल व्यावसायिकाचा बाजार उठलाय. कोट्यवधींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पण ही छापेमारी यशस्वी व्हावी म्हणून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं नियोजन, प्लानिंग फारच जबरदस्त होतं. कुणालाही या छापेमारीची (IT Raid) कानोकान खबर लागू नये, यासाठी आयकर विभागाने कमालीची गोपनीयता बाळगली होती. विशेष म्हणजे छाप्यावेळी तब्बल 120 गाड्यांचा ताफा घेऊन अधिकारांनी धाड टाकली. अडीचशेहून अधिकर आयकर विभागाचे (Income Tax) लोक छापेमारीच्या कारवाईत सहभागी होते. या सगळ्यांना घेऊन जाणं, छापेमारीसाठी जातोय, हे कुणाला कळू न देणं, तसं अवघडच होतं. पण तरिही हे एका कारणामुळे शक्य झालं. आयकराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लग्नाचे वऱ्हाडी आहोत, असं भासवत छापेमारीचा प्लान आखला होता. ऐकयला जितकं आश्चर्यकारक वाटतंय, तितकंच आश्यर्य ही छापेमारी यशस्वी झाल्यानंतर व्यक्त केलं जातंय.

वऱ्हाडी बनून आले, वरातच काढून गेले

वधू वरांच्या नावाचे स्टिकर लावलेल्या गाड्या घेऊन आयकराचे अधिकारी 1 ऑगस्टला धाड टाकण्यासाठी जालन्यात दाखल झाले. कुणी कल्पनाही केली नसेल, अशा प्रकारे नियोजन करत आयकरविभागाच्या गाड्या स्टिल व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर धडकल्या आणि त्यांचं धाबं दणाणलं. वधू वरांच्या नावाचे स्टिकर्स लावून आलेल्या गाडीत आयकर विभागाचे अधिकारी असतील, याचीही कुणी कल्पना केलेली नव्हती. यासोबत खास कोडवर्डही वापरण्यात आलेला होता.

हे सुद्धा वाचा

कोर्डवर्ड : दुल्हन हम ले जायेंगे

दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर्स लावून एक कोडवर्डचं तयार करण्यात आलेला होता. लोकांना वाटलं ही फौज तर वऱ्हाड्यांची आहे. पण वरात आयकर विभागाचे अधिकारी काढणार आहे, याची पुसटशीही कल्पना तेव्हा कुणाला आलेली नव्हती. अखेर नियोजन यशस्वी ठरलं. कुणालाही छापेमारीबद्दल कानोकान खबर लागली आहे. स्टिल व्यावसिकांच्या घरावर ,फार्म हाऊसवर, कार्यालयावर कसून तपास करण्यात आला. आठ दिवस केलेल्या तपासातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा असल्याचं आढळून आलं.

पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल, बिछान्यासह कपाटाखाली आणि पिशव्यांमध्ये भरुन ठेवलेली कॅश, डायमड्स, 32 किलो सोनं, 56 कोटी कॅश, असा एकूण 390 कोटी रुपयांचा एकूण मुद्देमादल जप्त करण्यात आलाय. आता या संपूर्ण प्रकरणाची छाननी केली जाते आहे. हा पैसा स्टील व्यावसायिकानं कुठून कसा जमवला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.