Jacqueline Fernandez: जॅकलीनला सर्व माहित होते तरीही तिने सुकेशकडून… आठ तासांच्या चौकशीनंतर उघड झाली धक्कादायक माहिती
सुकेशने जॅकलीनला 10 कोटींचे गिफ्ट दिले. यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या फारशी मांजरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. नोरा फतेहीलाही दिलेल्या कोट्यवधींच्या गिफ्टचा आरोपपत्रात उल्लेख आहे.
नवी दिल्ली : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा सध्ये जेलमध्ये आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आरोपी करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आज अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची तब्बल आठ तास चौकशी केली. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राजधानी नवी दिल्लीतल्या आर्थिक गुन्हे शाखेत ही चौकशी झाली. जॅकलीन आणि पिंकी यांची दिल्ली पोलिसांकडून समोरासमोर चौकशी झाली.
चौकशी दरम्यान जॅकलीन फर्नांडिस आणि पिंकी इराणी यांच्यात जोरदार भांडण देखील झाल्याचे समजते. पिंकी इराणी ही चंद्रशेखर याची सहकारी
पिंकी इराणी खोटे बोलत असल्याचा आरोप जॅकलीनने केला आहे. दिल्ली पोलिसांनी दोघींना समज दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दिल्ली पोलिसांनी जॅकलिनकडे सुकेश चंद्रशेखर आणि तिच्या रिलेशनशीप बाबत चौकशी केली. सुकेशने तिला महागड्या भेटवस्तू का दिल्या? ती सुकेशला किती वेळा आणि कुठे भेटली? ती सुकेशला किती दिवसांपासून ओळखतेय असे प्रश्न विचारले. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त छाया शर्मा आणि विशेष आयुक्त रवींद्र यादव यांच्यासह 6 अधिकाऱ्यांच्या टीमने जॅकलीनची चौकशी केली.
सुकेशबाबत जॅकलीनला सर्व माहिती होती. तरीही ती त्याच्या संपर्कात होती. अशी माहिती देखील समोर आली आहे.
52 लाखांचा घोडा, 9 लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’
200 कोटी रुपयांची खंडणी वसुली प्रकरणात ईडीने कथित ठग सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य 6 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र यापूर्वीच दाखल झाले आहे.
या आरोपपत्रात महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
सुकेशने जॅकलीनला 10 कोटींचे गिफ्ट दिले. यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या फारशी मांजरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. नोरा फतेहीलाही दिलेल्या कोट्यवधींच्या गिफ्टचा आरोपपत्रात उल्लेख आहे.
महागड्या गिफ्ट्समध्ये दागिने, हिरेजडित दागिणे, क्रॉकरी, 4 फारशी मांजरी (एका मांजरीची किंमत जवळपास 9 लाख रुपये). याशिवाय लाखो रुपये किमतीच्या एका घोड्याचाही समावेश आहे.
सुकेश ज्यावेळी जेलमध्ये होता त्यावेळी तो जॅकलीनसोबत संवादही साधत होता. ज्यावेळी सुकेश जामिनावर सुटला त्यावेळी त्याने चेन्नईसाठी, तर मुंबई ते दिल्लीसाठी जॅकलीनसाठी एक चार्टर्ड विमान बुक केले होते. आरोपपत्रातील दाव्यानुसार चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या दोघांनीही एकत्रित मुक्काम केला होता.