जैन साधूची मुंबईतील मंदिरात आत्महत्या, धर्मगुरुंनी स्वप्नात येऊन परत बोलावल्याची सुसाईड नोट

मुंबईतील घाटकोपर भागात पंतनगर परिसरातील हिंगवाला लेनमध्ये असलेल्या जैन मंदिरात हा प्रकार घडला. (Jain Sadhu Suicide Mumbai Temple )

जैन साधूची मुंबईतील मंदिरात आत्महत्या, धर्मगुरुंनी स्वप्नात येऊन परत बोलावल्याची सुसाईड नोट
जैन साधूची मंदिरात आत्महत्या
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 9:21 PM

मुंबई : जैन साधूने मंदिरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. जैन धर्मगुरुने स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्याचं साधूने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी मनोहर लाल मुनी महाराज साहेब यांनी आयुष्याची अखेर केली. (Jain Sadhu commits Suicide in Mumbai Temple in Suicide Note recites in Dream Guru asked to come back)

जैन मंदिरातच आयुष्य संपवलं

मुंबईतील घाटकोपर भागात पंतनगर परिसरातील हिंगवाला लेनमध्ये असलेल्या जैन मंदिरात हा प्रकार घडला. ज्या मंदिरात ते गेली काही वर्ष सेवा करत होते, तिथेच मनोहर लाल मुनी महाराज साहेब यांनी टोकाचं पाऊल उचललं. जैन मंदिरामध्ये बुधवारी रात्री उशिरा 71 वर्षीय महाराजांनी आत्महत्या केली. त्यांचे पार्थिव घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख?

मनोहर लाल मुनी महाराज साहेब हे जैन साधू होते. “आता तुमचे पृथ्वीवरील सर्व सामान्यांसाठीचे काम संपलेले आहे. तुम्ही परत या, आपण पूजा करुया” असं जैन धर्मगुरुंनी आपल्या स्वप्नात येऊन सांगितल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेले आहे. पोलिसांना या प्रकरणात घातपात किंवा संशयास्पद काही आढळलेले नाही.

बौद्ध भिख्खूची आत्महत्या

महिन्याभरापूर्वीच बौद्ध भिख्खूने आत्महत्या केल्याची घटना थायलंडमध्ये उघडकीस आली होती. भगवान गौतम बुद्ध यांना प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिख्खूने तलवारीने स्वतःचाच शिरच्छेद केला. मृत्यूपश्चात जीवनामध्ये पुण्य कमवण्याच्या आसक्तीतून भिख्खूने टोकाचं पाऊल उचललं. थायलंडमध्ये 68 वर्षीय थम्मकॉर्न वांगप्रे (Thammakorn Wangpreecha) यांनी तलवारीने स्वतःचेच डोके उडवले होते.

थम्मकॉर्न वांगप्रे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अघोरी प्रकार करण्याचा बेत आखत होते. गेल्या गुरुवारी 15 एप्रिल रोजी नोंग बुआ लम्फु प्रांतातील वट फू हिन मंदिरात ते मृतावस्थेत आढळले. त्यावेळी त्यांचे शिर पार्थिवाशेजारी पडलेले आढळले.

संबंधित बातम्या :

भगवान बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी अघोरी प्रकार, बौद्ध भिख्खूने स्वतःचंच डोकं तलवारीने उडवलं

(Jain Sadhu commits Suicide in Mumbai Temple in Suicide Note recites in Dream Guru asked to come back)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.