मंदिरात तो आला..त्याने पाया पडला…आजूबाजुला पाहिलं आणि केलं असं कृत्य Watch Video

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक चोरीची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चांदीच्या छत्राची किंमत बाजारात जवळपास 2 लाख रुपये इतकी आहे. पुजाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंदिरात तो आला..त्याने पाया पडला...आजूबाजुला पाहिलं आणि केलं असं कृत्य Watch Video
video: मंदिरात देवाला नमस्करा केला आणि केलं असं काम, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 6:28 PM

जयपूर : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. हे प्रकरण जयपूरमधील मंदिरात चोरीचं आहे.मीडिया रिपोर्टनुसार चोरीची घटना जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावातील आहे. चोराने मंदिरात 3 किलो वजनी छत्र चोरी केलं आहे. काही भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांना मंदिरात चोरी झाल्याचं कळलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांना पकडण्यासाठी तपासाची चक्र फिरवण्यात आली.चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मात्र फुटेज बघितल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. कारण चोराने चोरी करण्यापूर्वी देवाची क्षमा मागितल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

मंदिरातील पुजाऱ्याच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात आलो तेव्हा चांदीचं छत्र होतं. पण त्यानंतर गुरुवारी सकाळी पाच वाजता पूजा करण्यासाठी गेलो तेव्हा मात्र चोरी झाल्याची कल्पन आली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि चोरी दुपारी दीड वाजता मंदिरात आल्याचं कळलं. तसेच मंदिरातील चांदीचं छत्र चोरून नेलं.पोलिसांच्या माहितीनुसार, चांदीच्या छत्राची किंमत बाजारात जवळपास 2 लाख रुपये इतकी आहे. पुजाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?

चोर मंदिरात घुसताना दिसत आहे. त्यानंतर इथे तिथे पाहतो आणि देवाला नमस्कार करतो. त्यानंतर उजव्या बाजूला जात रेकी करतो.नंतर मागे वळून कोणाला तरी इशारा करतो.आसपास कोणी नसल्याचं कळताच मंदिराचे दरवाजे बंद करतो. देवाला पुन्हा नमस्कार करतो आणि चांदीचं छत्र काढतो. तसेच ते छत्र आपल्या शर्टच्या आत लपवतो आणि पळ काढतो.

पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मंदिरात सहा महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा चोरी झाली आहे.सहा महिन्यांपूर्वी 5 छत्र, दोन महिन्यांपूर्वी 5 छत्र चोरी झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर ग्रामस्थ नवं छत्र दान करत होते. चोरीची घटना रोखण्यासाठी त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर धरणं आंदोलन केलं. मनोहर पोलीस स्टेशन प्रभारी सीआय मनिष शर्मा यांनी सांगितलं की, या भागात जवळपास 200 मंदिरं आहे. सर्व मंदिरांची सुरक्षेसाठी पोलीस तैनात करणं शक्य नाही. पण सीसीटीव्ही हाती लागल्याने चोराला पकडणं सोपं होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.