Jaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Jaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज
पोलीस
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 7:06 PM

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर (Nagpur) आता दहशतवाद्यांच्या (Terrorist) टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट (High Alert) जारी करण्यात आलाय. तसंत नागपूर पोलीसही सतर्क झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना ताजी आहे. अशावेळी आता नागपुरात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती मिळत आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘पोलीस कुठल्याही घटनेला उत्तर देण्यासाठी सज्ज’

नागपूर पोलिसांकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. पोलीस कुठल्याही घटनेला उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, असं अमितेश कुमार म्हणाले. दरम्यान, ज्या ठिकाणांची रेकी केली त्या भागाची माहिती सध्या उघड केली जाणार नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीनं नागपूर पोलीस सज्ज आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संवेदनशील भागात फोटो, चित्रीकरणास मनाई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144(1)(3) प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावं, असं आवाहन अमितेश कुमार यांनी केलंय.

नागपूरची चिंता वाढली!

दुसरीकडे नागपुरात 30 टक्के पात्र नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोज न घेतल्यामुळं इतरांचं टेन्शन वाढलंय. नागपुरात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकलीय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 441 नवे रुग्ण आढळून आलेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोरोना लस हे महत्त्वाचं हत्यार आहे. पण नागपुरात आतापर्यंत पात्र नागरिकांपैकी 30 टक्के जणांनी लसीचा दुसरा डोज घेतला नाही. त्यामुळं नागपूरकरांची चिंता आणखीच वाढलीय.

इतर बातम्या :

‘शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, पटोलेंची खोचक टीका

‘आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्याची आरोग्य आणि आर्थिक घडी बिघडली’, भाजपचा घणाघात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.