12 ऊसतोड मजूर तब्बल दोन वर्ष बंधक, महिलेच्या चलाखीने सुटका, जालना ते सोलापूर थरार

बारा ऊस तोडणी मजुरांना तब्बल दोन वर्ष बंधक करुन ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Sugarcane cutting workers Jalana Solapur

12 ऊसतोड मजूर तब्बल दोन वर्ष बंधक, महिलेच्या चलाखीने सुटका, जालना ते सोलापूर थरार
सुटका झालेले ऊस तोडणी मजूर
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 6:03 PM

जालना: ऊस तोडणी हंगाम सुरु झाला की मराठवाड्यातील जिल्ह्यातून ऊस तोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीच्या कामासाठी जातात. हंगाम संपल्यानंतर ते जिल्ह्यामध्ये परत येत असतात. हे नियमितपणानं सुरु असतं. मात्र, बारा ऊस तोडणी मजुरांना तब्बल दोन वर्ष बंधक करुन ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारा पैकी तीन जण काही दिवसांपूर्वी तेथून पळून आले. त्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना माहिती दिली. यानंतर जालना पोलिसांनी नऊ ऊस तोडणी कामगारांची तब्बल दोन वर्षानंतर सुटका केली आहे. हे प्रकरण आता सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. (Jalana Police rescued Sugarcane cutting workers from Solapur Badhalewadi village Farm)

बारा ऊस तोडणी मजूर दोन वर्ष बंधक

ऊस तोडणी साठी गेल्यानंतर अडकून पडलेल्या मजुरांची जालना पोलिसांनी केली सुटका केलीय. त्यापूर्वी सोलापुर जिल्ह्यातील बाधलेवाडी येथून तीन ऊस तोडणी मजुरांनी येथुन पळ काढल्यानं हा प्रकार उघडकीस आला. जालना पोलिसांनी मजुरांची दोन वर्षांनी सुटका करण्यात यश मिळवलं.

शेतीच्या कामाल लावलं

ऊस तोडणीचे काम संपल्यानंतर या बारा मजुरांना एका शेतात दोन वर्षे बंधक करून शेतीचे काम करून घेण्यात येत होते. या मधील त्या ठिकाणी असलेली एक महिला, तिची आई आणि नऊ वर्षाचा मुलगा तेथून पळून जालन्यात आले. आणि हा सर्व प्रकार जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांना सांगितला.

आमदार कैलास गोरंटयाल यांचे प्रयत्न

सोलापूरमधून पळून आलेल्या ऊस तोडणी मजुरांनी आमदार कैलास गोरंटयाल यांची भेट त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगतिला. यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी हा प्रकार जालना पोलिसांना सांगितला. जालना पोलिसांनी पथक पाठवून या सर्व मजुरांची सुटका केली. यानंतर त्या मजुरांना जालन्यात आणण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे

संबंधित बातम्या:

शरद पवार, रोहित पवारांवरील टीका भोवली, भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे सायबर पोलिसांच्या ताब्यात

पत्नी, मेहुणी, साडू तिघांनी घेरलं, अंगावर पेट्रोल ओतलं, त्याचा जिवाच्या आकांताने आक्रोश, अखेर होरपळून मृत्यू

(Jalana Police rescued Sugarcane cutting workers from Solapur Badhalewadi village Farm)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.