13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत विवाह, सुहागरात आणि वैधव्याचं नाटक, लग्न जुळवण्यासाठी शिक्षिकेचा उपद्व्याप

मंगळदोष निवारणासाठी शिक्षिकेने लग्न ते वैधव्य असा उपद्व्याप केल्याचा दावा केला जात आहे. (Jalandhar Teacher Marries Student )

13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत विवाह, सुहागरात आणि वैधव्याचं नाटक, लग्न जुळवण्यासाठी शिक्षिकेचा उपद्व्याप
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 9:14 AM

जालंधर : शिक्षिकेने आपल्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता सुहागरात आणि वैधव्याचं नाटकही तिने केलं. मंगळदोष दूर करण्याच्या अंधश्रद्धेतून शिक्षिकेने हे कृत्य केल्याची माहिती आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पंजाबमधील जालंधर शहरातील बस्ती बावा खेल परिसरात ही घटना घडली. (Jalandhar Punjab Teacher Marries School Student forcibly)

मंगळदोष निवारणासाठी उपाय

शिक्षिकेने आपल्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्याला ट्यूशनच्या बहाण्याने घरी बोलावलं. त्याला सहा दिवस घरी डांबून ठेवत लग्न लावलं. हे लग्न केवळ प्रतिकात्मक होतं. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षिकेचं लग्न ठरत नव्हतं. तिच्या पत्रिकेत मंगळदोष असल्याची माहिती एका ज्योतिषाने दिली होती. मंगळदोष निवारणासाठी तिला हा उपाय सुचवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

हळद-मेहंदी ते वैधव्याचं नाटक

पीडित 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. विद्यार्थ्याच्या अभ्यासावर मेहनत घेण्यासाठी काही दिवस त्याला आपल्या घरी सोडावे, असं तिने त्याच्या कुटुंबीयांना सुचवलं. त्यामुळे तेही तयार झाले. 13 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिकेने सहा दिवस जबरदस्ती स्वतःच्या घरी थांबवून ठेवलं. या काळात हळद, मेहंदी यासारखे लग्नाचे सर्व विधीही पूर्ण केले. त्यानंतर पहिली रात्र म्हणजेच ‘सुहागरात’ करण्याचं नाटकही केलं. त्यावर कडी म्हणजे ज्योतिषाच्या सांगण्यावरुन बांगड्या फोडून विधवा होण्याचं ढोंगही तिने रचलं. अगदी शोकसभाही आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची पोलिसात धाव

सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आलं. त्याने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार शिक्षिकेने आणि तिच्या घरच्यांनी बालकाकडून घरातील कामंही करुन घेतली. विद्यार्थ्याच्या संतप्त कुटुंबीयांनी बस्ती बावा खेल पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी शिक्षिका आणि ज्योतिषाने पोलिस स्थानकात येऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी तक्रारही मागे घेतली. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लग्न प्रतिकात्मक असले, तरी अल्पवयीन बालकासोबत विवाहविषय कृत्य करणं बेकायदेशीर आहे, कुटुंबीयांच्या सहमतीविना अल्पवयीन बालकाला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे अपराध आहे, असं जालंधरचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

अवघ्या दोन फुटांच्या अजीमशी लग्नासाठी तब्बल डझनभर मुलींची रांग, सलमानकडूनही भेटीचा प्रस्ताव!

(Jalandhar Punjab Teacher Marries School Student forcibly)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.