Crime News : 12 मोटारसायकलीसह अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात, चोरी करायचे आणि…
दोघांची अजून चौकशी करण्यात येणार आहे. कारण दोघांनी अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोघांनी चोरी केलेल्या बाईक त्या मालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जळगाव : रावेर (Raver) तालुक्यातील सावदा येथून चोरीच्या तब्बल 12 दुचाकींसह दोन अट्टल चोरट्यांना सावदा पोलिसांनी (Savda Police) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी (jalgaon crime news) त्याला ताब्यात घेतले असून चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. जावेद मुबारक तडवी (पातोंडा, ता.बर्हाणपूर) व मुनाफ मुबारक तडवी (कोळवद, ता.यावल) अशी केलेल्या आरोपींची नावं आहेत. नाकाबंदी असताना संशयास्पद काही गोष्टी आढळल्याने त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउड़वीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
नाकाबंदी सुरु होती, त्यावेळी पोलिसांनी काही मोटारसायकलींची चौकशी केली. त्यावेळी तिथं चौकशी करीत असताना पोलिसांनी संशय आहे. त्यावेळी संशयित जावेद मुबारक तडवी हा बाईक चालवत होता. त्याला अधिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या अधिक बाईक चोरीच्या सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
नाकाबंदी दरम्यान नेमकं काय घडलं…
सावद्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार उमेश पाटील यांनी नाकाबंदी दरम्यान संशयित जावेद मुबारक तडवी (पातोंडा) याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. तसेच यााबाबत सावदा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाल्याने आरोपीने आपला साथीदार मुनाफ मुबारक तडवी (कोळवद) असल्याची कबुली देत आतापर्यंत रावेर तालुक्यातील सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता.जामनेर, लालबाग, ता.बर्हाणपूर भागातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आत्तापर्यंत 12 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
दोघांची अजून चौकशी करण्यात येणार आहे. कारण दोघांनी अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोघांनी चोरी केलेल्या बाईक त्या मालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.