Jalgaon : चाकूचा धाक दाखवून नव्या नवरीला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि घरात डांबलं! रोडरोमियोला अटक

तू माझी झाली नाहीत, तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही, असं म्हणत या तरुणानं नवविवाहितेला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि तिचं पलायन केलं.

Jalgaon : चाकूचा धाक दाखवून नव्या नवरीला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि घरात डांबलं! रोडरोमियोला अटक
मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 8:08 AM

जळगाव : एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत चाकूने तरुणीला (Aurangabad Crime News) भोसकण्यात आलं. 200 फूट लांब या तरुणीला खेचत नेल, चाकूने भोसकून तिची हत्या (Murder by knife) करण्यात आल्यानं एकच खळभळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता जळगावमध्येही (Jalgaon Crime) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. तू माझी झाली नाहीत, तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही, असं म्हणत या तरुणानं नवविवाहितेला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि तिचं पलायन केलं. यावेळी तरुणानं नवविवाहितेच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला होता. तसंच तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत तरुणाच्या मुसक्या आवळ्यात.

कधीची घटना?

ही खळबळजनक घटना 12 मे रोजी घडली. पीडित तरुणी दुपारी तीन वाजता गुजराल पेट्रोल पंपकडून घरी जात होती. त्यावेळी या तरुणीला वाटेत एकानं अडवलं.

कोणंय तो नराधम?

पीडितेला अडवणाऱ्या तरुणानं नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय 20 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. निखिल हा दुचाकीवर आला आणि त्याने पीडितेचा रस्ता अडवला. तू माझी झाली नाहीस, तुला कुणाचीच होऊ देणार नाही, म्हणत निखिलने पीडितेला चाकूचा धाक दाखवला. इतकंच काय तर तिला जबरदस्त दुचाकीवर बसवलं आणि तिला शिवाजी नगर इथं घेऊन गेला. शिवाजी नगर इथल्या मावशीच्या घरी निखिलने तिला डांबून ठेवलं होतं.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

या तरुणानं पीडितेच्य वडिलांना जीवे मारण्याची धकमीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निखिल सोनावणे या आता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव पोलीस या घटनेप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.