खेळत असताना शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, परिसर हादरला

त्या शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम हे रोजगार हमी योजनेतून केलं जातं होतं. पण नशिराबाद ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळं हे काम थांबलं. हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यानेच...

खेळत असताना शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, परिसर हादरला
JalgaonImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:01 AM

जळगाव : खेळता खेळता शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाल्याची घटना जळगाव (Jalgaon) तालुक्यातील नशिराबाद (Nashirabad) गावात घडली आहे. मोहित अशोक नारखेडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचबरोबर दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी संपुर्ण हादरला होता. विशेष म्हणजे संरक्षण भिंतीचं काम हे रोजगार हमी योजनेतून केलं जातं होतं अशी माहिती मिळाली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे अशोक नारखेडे मोहितचं गाव आहे. त्याचे वडील अशोक नारखेडे एका सिमेंटच्या कंपनीत ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, तर आई निर्मलाबाई मोलमजुरी करते. दोघेही शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. शाळेला सुट्टी असल्याने मोहित मित्रांसोबत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात खेळत होता. खेळता खेळता त्याच्या अंगावर शाळेची संरक्षण भिंत कोसळली. त्यात मोहित गंभीर जखमी झाला. गावातल्या लोकांनी त्याला लगेच खासगी रुग्णालयात हलवलं. पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केलं होतं. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम हे रोजगार हमी योजनेतून केलं जातं होतं. पण नशिराबाद ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळं हे काम थांबलं. हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यानेच मोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप लालचंद पाटील जिल्हा परिषद सदस्य यांनी केला आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ंये घबराहाटीचे वातावरण आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.