कपडे धुण्यासाठी चिमुकल्याला घेऊन ती खदानीवर गेली पण, असं काही होईल तिने विचारही केला नव्हता ! खेळता-खेळता घसरून थेट…
रोजचा दिवस नेहमीप्रमाणे उगवला. अवघ्या तीन वर्षांच्या लेकाला घेऊन त्याची आई कपडे धुण्यासाठी खदानीवर गेली. मात्र तिथे गेल्यानंतर जे घडलं ते पाहून अख्खं गाव हादरलं. त्या मातेचा आक्रोश ऐकवत नव्हता. एका क्षणात जे घडलं त्याने तिचं संपूर्ण आयुष्य उलटंपालटं झालं. त्यादिवशी नेमकं काय झालं ?
जळगाव | 3 ऑक्टोबर 2023 : आपलं आयुष्य खूपचं बेभरवशाचं आहे. एका क्षणात काय होईल, परिस्थिती कशी बदलेल कोणीच सांगू शकत नाही. माणूस नेहमी पुढल्या आयुष्याची, भविष्याची स्वप्न रंगवत असतो. मी यंव करेन नी त्यंव करेन असा विचार करत मनोरथांचे इले सजवत असतो. पण क्षणभरातील एखाद्या घटनेने सगळी बाजी पलटते आणि आपण धाडकन जमीनीवर कोसळतो.
आई-बाप आपल्या लेकरांसाठीही अशीच स्वप्न रंगवतात, त्यांच्या मोठेपणासाठी विचार करतात, भविष्यासाठी तरतूद करतात. जळगाव मधल्या एका महिलेनेही तिच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलासाठी अनेक स्वप्न पाहिली होती, पण आता ती केवळ स्वप्नच उरलीत. एका क्षणात घडलेल्या त्या दुर्घटनेने तिची सगळी स्वप्नं विखरली. तिच्या काळजाचा तुकडा तिच्यापासून असा दूर (crime news) गेला की… त्या मातेचा आक्रोश ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
त्या दिवशी काय झालं ?
जळगावातील एरंडोल तालुक्यातील सावदे गावात ही दुर्घटना घडली. खदानीत पडून पाण्यात बुडाल्यामुळे अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.रोहित पाटील असे त्या चिमुकल्याचे नाव आहे.
सावदे गावात राहणाऱ्या पठाण कुटुंबियांना रोहित हा एकुलता एक मुलगा होता. घटनेच्या दिवशी रोहित याला सोबत घेवून त्याची आई गावातील खदानीकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. तेथे पोचल्यानंतर चिमुकला मुलगा तिथेच आजूबाजूला खेळत होता. तर त्याची आई कपडे धुण्यात मग्न होती. मात्र खेळता खेळता अवघ्या तीन वर्षांच्या रोहितचा पाय घसरला आणि तो खदानीत पडला. पाण्यात बुडू लागला. आजूबाजूंच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले.
त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाका-तोंडात बरंच पाणी गेल्याने त्याचा जीव गेला. याप्रकरणी पाळधी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून आई वडिलांसह नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला.