मदरशाच्या नावाखाली बिहारच्या मुलांची महाराष्ट्रात तस्करी, कोण आहे या प्रकरणामध्ये ? पोलिसांच्या हाती काय लागलं?

मनमाड रेल्वे स्थानक आणि भुसावळ रेल्वे स्थानकातून बालकांची सुटका केल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी आता भुसावळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

मदरशाच्या नावाखाली बिहारच्या मुलांची महाराष्ट्रात तस्करी, कोण आहे या प्रकरणामध्ये ? पोलिसांच्या हाती काय लागलं?
भुसावळ रेल्वे पोलीस बिहारमधील पालकांची भेट घेणार
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 10:55 AM

जळगाव : मुलांच्या तस्करीच्या खळबळजनक घटनेप्रकरणी आज भुसावळ रेल्वे पोलीस बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पालकांच्या भेटीला जाणार आहेत. मानवी तस्करीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोहमार्ग पोलीस या दिशेने तपास करण्यासाठी बिहारला जाणार आहेत. दानापूर पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळ येथे 29 तसंच मनमाड रेल्वे स्टेशनवर 30 अल्पवयीन बालकांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली होती. पोलिसांनी या मुलांची चौकशी केली असता, आम्हाला मदरशात नेत असल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी भुसावळ येथे 1 तर मनमाड येथून 4 मौलवींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची बाल हक्क आयोगाने देखील दखल घेतली आहे.

मदरसाच्या नावाखाली तस्करी केली जात असल्याचा संशय

ऑपरेशन आहट अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मनमाड रेल्वे स्थानकात 30 मे रोजी प्रवासी गाडीतून 8 ते 15 वयोगटातील 30 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या 4 संशयित व्यक्तींना अटक करत त्यांच्याविरोधात मानवी तस्करीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. याच तपासाचा भाग म्हणून भुसावळ रेल्वे पोलीस बिहारला जाऊन मुलांच्या पालकांची भेट घेणार आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली होती कारवाई

गाडी नंबर 01040 दानापूर-पुणे एक्सप्रेसमध्ये मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकातून गाडी सुटल्यानंतर मनमाड स्थानकापर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह 8 ते 15 वयोगटातील 30 मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

हे सुद्धा वाचा

वैद्यकीय तपासणीनंतर या मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत नाशिक बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. तर भुसावळ रेल्वे स्थानकातूनही अशाच पद्धतीने 29 बालकांना ताब्यात घेण्यात आले. एकूण 59 मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, मनमाड आणि भुसावळ येथे भादंवी 577 / 23 अन्वये 370 तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.