Jalgaon Crime : भलाई का जमाना ही नही रहा ! सल्ला देणाऱ्या उपसरपंचाला दांडक्याने मारहाण , त्यांचं नेमकं काय चुकलं ?

उपसरपंचाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Jalgaon Crime : भलाई का जमाना ही नही रहा ! सल्ला देणाऱ्या उपसरपंचाला दांडक्याने मारहाण , त्यांचं नेमकं काय चुकलं ?
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 9:14 AM

जळगाव | 14 ऑक्टोबर 2023 : गावात चांगलं वातावरण रहावं, शांतता नांदावी यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न असतात. एखादा गुन्हा किंवा छोटी-मोठी चूक घडताना दिसत असेल तर सद्सद् विवेकबुद्धी जागृत असलेला कोणीही इसम ते रोखण्याचा प्रयत्न करतो. मात्र दरवेळेस त्यात यश मिळेलंच असं नाही. काही वेळा चांगलं करायला जाणं आपल्याच अंगावर शेकू शकतं.

असंच एक प्रकरण जळगावात (jalogaon news) घडलं आहे. वीज चोरी करू नका, असं आवाहन करणार गावच्या उपसरपंचाला फारच महागात पडलं आहे. कारण त्याच कारणामुळे त्याला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण (beaten up) करण्यात आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द गावात ही घटना घडली. या गावात वीज चोरी होत असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि गावातीव काही व्यक्ती एकत्र जमले होते. मुख्य वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरी करू नका असे उपसरपंचानी सांगितले. मात्र ते ऐकून हा प्रकार करणाऱ्या संबंधितांना प्रचंड राग आला.

त्यांनी उपसरपंचाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तर सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळही केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या मारहाणीत उपसरपंच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांतर्फे पुढील तपास करण्यात येणार आहे.

जळगावमधील अन्य बातम्या

झाडावर चढून एकाचं अनोखं आंदोलन

चोपडा तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने सतत आंदोलन करण्यात येत आहे. त्याच दरम्यान एका आंदोलनकर्त्याने अनोखं आंदोलन केले. झाडावर चढून त्या आंदोलनकर्त्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रम अंतर्गत तालुका स्थरीय अमृत कलशचे पूजन

मुक्ताईनगर पंचायत समिती तर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रम अंतर्गत तालुका स्थरीय अमृत कलशचे पूजन करण्यात आले. संपूर्ण तालुका भरातून प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत माती जमा करून या कलश मध्ये जमा करून पूजन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच यावेळी उपस्थित होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.