सलून व्यावसायिकाचा राहत्या घरी गळफास, दोन चिमुरड्यांवरील पितृछत्र हरपलं

जळगाव : लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर जळगावातील सलून व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचललं. कर्जबाजारी झाल्यामुळे 35 वर्षीय गजानन कडु वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलांवरील छत्र हरपलं आहे. (Jalgaon Saloon worker commits Suicide after unable to repay loan as lockdown extends) गजानन वाघ गेल्या काही वर्षांपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. […]

सलून व्यावसायिकाचा राहत्या घरी गळफास, दोन चिमुरड्यांवरील पितृछत्र हरपलं
जळगावात सलून व्यावसायिकाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:06 AM

जळगाव : लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर जळगावातील सलून व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचललं. कर्जबाजारी झाल्यामुळे 35 वर्षीय गजानन कडु वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलांवरील छत्र हरपलं आहे. (Jalgaon Saloon worker commits Suicide after unable to repay loan as lockdown extends)

गजानन वाघ गेल्या काही वर्षांपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगर परिसरात भाड्यावर खोली घेऊन ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. सलून दुकानावर कारागीर म्हणून ते काम करत होते.

आर्थिक परिस्थिती कमकुवत

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळल्याची माहिती आहे.

कर्जाचा बोजा वाढल्याने टोकाचं पाऊल

गजानन यांनी अखेर उसनवारी करुन घरखर्च भागवण्यास सुरुवात केली. मात्र डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. गजानन वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, पाच वर्षांचा मुलगा ऋषीकेश आणि तीन वर्षांची मुलगी वैष्णवी असा परिवार आहे.

गेल्या वर्षीही सलून व्यावसायिकाची आत्महत्या

याआधी, चंद्रपुरातील उर्जानगर-नेरी येथे राहणाऱ्या सलून चालकाने आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटनाही उघडकीस आली होती. स्वप्नील चौधरी असं या 27 वर्षीय सलून चालकाचं नाव होतं. त्याने घरीच गळफास घेऊन गेल्या वर्षी आपलं जीवन संपवलं होतं.

स्वप्नीलच्या आई-वडिलांचं वर्षभरापूर्वीच निधन झालं होतं. यानंतर त्याने शहराच्या अयप्पा मंदिराजवळ छोटं सलूनचं दुकान सुरु केलं होतं. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील मोठा काळ त्याला आर्थिक तंगीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अखेर त्याने याला कंटाळून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली

संबंधित बातम्या :

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प, आर्थिक तंगीला कंटाळून चंद्रपूरमध्ये सलून चालकाची आत्महत्या

(Jalgaon Saloon worker commits Suicide after unable to repay loan as lockdown extends)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.