जळगाव : अवैध धंदा करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीत पोलिसांनी तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 51 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात ही धाड टाकण्यात आली आहे. (Jalgaon Raid on a illegal traders)
जळगाव जिल्ह्यातील विदर्भ खान्देश सीमेलगत असलेल्या कुरा काकोडा नजीक पिंपळा फाट्यावर अनेक अवैध धंदे चालतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या धंद्याच्या अड्ड्यावर धाड टाकली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली.
यात 6 महागड्या चार चाकी गाड्या, दहा बाईक, 51 मोबाईल आणि 2 लाख 60 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा सर्व मुद्देमाल 35 लाखांचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी 51 जणांना ताब्यात घेतले आहे. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आर्चित चांडक व पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने ही धाड टाकली आहे.
दरम्यान जळगावातील कुरा काकोडा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. कुरा काकोडा हा परिसर विदर्भ खान्देशच्या सीमेवर आणि सातपुडा वन क्षेत्रात आहे. त्यामुळे याठिकाणी नागमणी, जुगार, सट्टा असे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण स्थानिक पोलीस हे कायम याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पण काल टाकलेल्या धाडसत्रामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंत करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे पोलिसांचा वचक असाच राहणार की पुन्हा थातूर मातूर कारणं देऊन पुन्हा अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे होईल हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Jalgaon Raid on a illegal traders)
Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलच्या किंमती खिसा कापणार, वाचा राज्यातील आजचे दरhttps://t.co/svmNawqhkf
#petrolPrice #petrolrate #petroldieselpricehike
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या :
वीजजोडणी कापल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, अंबरनाथच्या रेल्वे पोलिसाचा प्रताप
लाखोंची डील करुन पैसे बळकावले, दोन वर्ष पोलिसांना चकवा, अखेर दिल्लीत दाम्पत्याला बेड्या