जळगाव : अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon District) समोर आला आहे. आईनं आपल्या पोटच्या मुलाला प्रियकराच्या मदतीनं संपवल्यानं एकच संताप व्यक्त केला जातो आहे. पोटच्या लेकराला आईचे अनैतिक संबंध कळल्यामुळे आईनंच लेकराच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. जळगावात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानं एकच खळबळ उडाली असून हत्येचा (Murder) कट रचणारी आई आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून जळगावातील या प्रेमीयुगुलानं अवघ्या 15 वर्षांच्या मुलाला मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटवलं होतं. पोलिसांनी मोठ्या शर्थीनं याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जेत आहे. स्वतःचं पाप झाकण्यासाठी चक्क आईनंच मुलाला संपवण्याचा कट (Mother killed his own son) रचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 16 जानेवारीला 15 वर्षांच्या मुलाच्या आईनं त्याला कबुतरासाठी पिंजरा घ्यायच्या उद्देशानं मध्य प्रदेशात पाठवलं होतं.
जळगावच्या सावखेडा शिवारातील जलाराम नगरमध्ये राहणाऱ्या पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील या 15 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात नेऊन त्याला गळफास देण्यात आला. या हत्येचा थरारक आणि अंगावर काटा आणणारा घटनाक्रमही उघडकीस आला आहे.
पुरुषोत्तम उर्फ प्रशांत याला आपल्या आईच्या अनैतिंक संबंधांबाबत कुणकुण लागली होती. प्रशांतची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांच्या एक वर्षापासू अनैतिक संबंध होते. यामुळे प्रशांतने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला. मात्र प्रमात आकंठ बुडालेल्या मंगलाबाई आणि प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याचाच काटा काढण्याचा कट रचला.
16 जानेवारी रोजी पुरुषोत्तमच्या आईनं त्याला कबुतराला पिंजरा घ्यायला, जा असं सांगून आपला प्रियकर प्रमोदसोबत पाठवलं. प्रमोद आपल्या आणखी एका मित्राला घेऊन पुरुषोत्तमला मध्य प्रदेशातूल बऱ्हाणपूरच्या जंगलात गेला. त्यानंतर त्यांनी रावेरातून एक दोरही विकत घेतला. बऱ्हाणपूरच्या आरीसगड इथल्या जंगलात नेऊन प्रमोदने पुरुषोत्तमला गळफास दिला आणि ठार मारलं.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. मुलगा हरवल्याची तक्रार दिल्यानं पोलिसांनी तपास सुरु होता. त्यातूनच हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पोलिसांचं लक्ष विचलीत करण्यासाठी आईनं चक्क पालकमंत्र्यांची भेट घेऊन मुलगा सापडत नाही, म्हणून राजकीय दबाव आणण्यासाठीही प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात तांत्रिक माहितीतून प्रमोद आणि पुरुषोत्तम एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी प्रमोदला ताब्यात घेतलं. सुरुवातील उडवाउडवीची उत्तर देणारा प्रमोद पोलिसांच्या खाकीचा हिसका पाहून पोपटासारखा बोलू लागला.
जळगावातील एका पैठणीसाडीच्या दुकानात प्रमोद आणि मंगलाबाईची ओळख झाली. यानंतर त्यांचं सूत जुळलं. प्रेमप्रकरण सुरु होई त्याचं रुपांतर अनैतिक संबंधात झालं. दरम्यान, दोघांच्या संबंधांबाबत जेव्हा पुरुषोत्तमला कळलं, तो आई घरी आली नाही, तर तिला विचारणा करु लागला होता. त्यामुळे हा अडथळा दूर करण्याचं पुरुषोत्तमच्या आईनंच त्याच्या हत्येचा कट रचला.
मुलगा आपल्या अनैतिक संबंधांबाबत नवऱ्याला सांगेल अशी भीती मंगलाबाईला वाटत होते. त्यामुळे मंगला त्याच्यापासून सावधही झालेली. आई घरी आली नाही, किंवा तिला उशीर झाला की मुलगा तिला कॉल करायचा. कुठे आहेस विचारायला व्हिडीओ कॉल करण्यासाठीही तगादा लावायचा. यातूनच मुलगा अडथळा ठरु लागल्यानं मंगलाबाईनं आपल्या प्रियकराकडूनच त्याची हत्या घडवून आणली.
मध्य प्रदेशात घेऊन गेलेल्या पुरुषोत्तमच्या गळ्यात प्रमोदनं चालता चालताच गळफास टाकला. दोर पुरुषोत्तमच्या गळ्यात टाकल्यानंतर त्यानं तो काटेरी झाडावर फेकून पुरुषोत्तमला वर ओढलं. हातपाय झटकत असलेल्या पुरुषोत्तमकडे निर्दयपणे बघत जीव जाईपर्यंत प्रमोदनं दोर ओढतच ठेवला होता.
सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?