आधी दारू ढोसली मग आश्रमशाळेतील मुलींवरच वाईट नजर; रक्षकच भक्षक ठरतो तेव्हा…

मुलींनी झालेली घटना सांगितली. त्यावेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. मुलींना विश्वासात घेतल्यानंतर मुलींना घडलेला प्रकार सांगितला. सर्व मुलींनी कर्मचाऱ्यांसमोर ही तक्रार मांडली.

आधी दारू ढोसली मग आश्रमशाळेतील मुलींवरच वाईट नजर; रक्षकच भक्षक ठरतो तेव्हा...
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:52 AM

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या देवझिरी येथील आश्रम शाळेच्या (Tribal Ashram School) मुलींच्या वसतिगृहात कीडसवाना प्रकार घटला. सदर घटनेमुळे वसतिगृहातील (Hostel) विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सचिन अशोक गडे असे वसतिगृह अधीक्षकाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या दुर्गम भागात असलेल्या देवझिरी येथे आदिवासी आश्रमशाळा आहे. या मुलींच्या वसतिगृहात अधीक्षक गडे याने दारू ढोसले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करत विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनींनी हा प्रकार शाळेच्या अधीक्षिका यांना सांगितला. त्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विद्यार्थिनींनी लेखी तक्रार केली. वसतिगृह अधीक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.

म्हणाला माझ्यासोबत यात्रेला चला

मुलीनं सांगितलं की, आमच्या शाळेच्या गावात यात्रा होती. सचिन गडे हा दारू पिऊन वसतिगृहात आला. तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. उपाशी कोण आहे, माझ्यासोबत चला यात्रेत जाऊन येऊ, असे सांगत होता. कुणाला बाहेर जायचं असेल तर सांगा आपण बाहेर जाऊन येऊ, असं हा अधीक्षक सांगत होता.

मुलींना निर्माण केला अडथळा

बाथरूममध्ये कपडे घ्यायला गेलेली मुलगी त्याला दिसली. तो तिच्याकडे जाऊन तिला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता. अकरा वाजता तो पुन्हा आला. वाळत घातलेले कपडे होते. तिथं तो काहीतरी करत होता.

मुलींचे कपडे निरखून पाहत होता

दुसऱ्या मुलीनं सांगितलं की, साडेआठ वाजता संबंधित व्यक्ती दारू पिऊन आला होता. त्यावेळी मुली घाबरल्या होत्या. त्यानंतर साडेअकरा वाजता तो आला नि मुलींचे कपडे निरखून पाहत होता. त्यामुळं मुलींनी ही तक्रार महिला अधिक्षीकेकडं केली.

सर्व कर्मचाऱ्यांसमोर मांडली तक्रार

महिला अधिक्षिका म्हणाल्या, मुलींनी झालेली घटना सांगितली. त्यावेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. मुलींना विश्वासात घेतल्यानंतर मुलींना घडलेला प्रकार सांगितला. सर्व मुलींनी कर्मचाऱ्यांसमोर ही तक्रार मांडली. मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार केली आहे. ती पुढं कारवाईसाठी पाठवली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.