जालना : जालन्यातील (Jalna Accident News) भीषण अपघातात एका तरुण मजुराचा जीव गेलाय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु होता. पण मृत्यूशी झुंज देताना तरुण मजुराला अपयश आलं आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुण मजुराचं वय अवघं 22 वर्ष असून त्याचं नाव मुकेश बाबरी (Mukesh Babari) असं आहे. मुकेश आणि त्याचा साथीदार मोसंबी तोडायचं काम करायचे. या दोघांना भरधाव वाहनाने चिरडलं. या भीषण अपघातामध्ये (Major Accident) दोघेही जण जखमी झाले होते. दोन्ही जखमी मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तिथे एका मजुराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची अजूनही मृत्यूशी झुंज सुरु आहे.
अंबड तालुक्यातील शिरनेर जवळ हा अपघात घडला. भरधाव अज्ञात वाहनानं मजुरांना धडक देत चिरडलं. दोन्ही मजूर यात गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेनं दोन्ही जखमी मजुरांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. या दोघांवरही अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेचच उपचारही सुरु केले होते. पण दुर्दैवाने त्यातील मुकेश बाबरी या 22 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला. या तरुण मजुराच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हा अपघात नेमका कसा घडला ते कळू शकलेलं नाही. मात्र भरधाव वेगामुळे मजुरांना वाहनानं चिरडलं असावं, अशी शंका व्यक्त केली जातेय.
मजुरांना चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाबाबत कोणतीही माहिती अद्याप कळू शकलेली नाही. या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय. दरम्यान, या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. या घटनेनं राज्यातल रस्ते अपघात सुरुच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. दररोज रस्ते अपघातातील बळींची संख्या वाढतच चाललीय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.