Jammu Kashmir: जम्मू काश्मिरात आणखी एका हिंदूची हत्या! बँक कर्मचारी विजय कुमारचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून
कुलगाममध्ये एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेला बँक कर्मचारी हिंदू होता. मूळच्या राजस्थानात राहणाऱ्या या बँक कर्मचाऱ्याची काश्मिरात हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir News) पुन्हा एकदा हिंदू नागरीकास अतिरेक्यांकडून (Jammu Kashmir Hindu Murder) निशाणा बनवण्यात आलं. कुलगाममध्ये एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेला बँक कर्मचारी हिंदू होता. मूळच्या राजस्थानात राहणाऱ्या या बँक कर्मचाऱ्याची काश्मिरात हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात बँक कर्मचारी असलेल्या विजय कुमार यांची हत्या करण्यात आली. विजय कुमार हा बँक मॅनेजर होता. कुलगाम भागातील एका बँकेचे मॅनेजर असलेल्या विजय कुमार यांच्यावर गुरुवारी सकाळी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला.अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
अतिरेक्यांकडून टार्गेट किलिंग
कुलगाममध्ये करण्यात आलेल्या बँक मॅनेजरच्या हत्याकांडानं आता संपूर्ण जम्मू काश्मिरात एकच खळबळ उडालीय. गेल्या काही दिवासंपासून अतिरेकी विरुद्ध हिंदू नागरीक असा संघर्ष संपूर्ण जम्मू काश्मिरात पाहायला मिळतोय. तणावपूर्ण घडामोडींमध्ये आता आणखी एका हिंदू नागरीकाची हत्या करण्यात आली आहे. कुलगाम जिल्ह्यात नुकतीच एका शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
अतिरेक्यांनी रजनी बाला नावाच्या शिक्षिकेवर गोळ्या झाडून तिला ठार मारलं होतं. शाळेत घुसून या शिक्षिकेवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना जाती असतानाच आता आणखी एका हत्येच्या घटनेनं जम्मू काश्मीर हादरुन गेलंय.
हिंदू नागरीक अतिरेक्यांच्या निशाण्यावर
जम्मू काश्मिरात हिंदू नागरीक अतिरेक्यांच्या निशाण्यावर आल्याचं बघायला मिळतंय. खोऱ्यात हिंदू नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारसह पोलीस यंत्रणा आणि प्रशासनासमोरचीही आव्हानं वाढली आहेत. अतिरेक्यांनी सातत्यानं दिवसाढवळ्या नागरीकांना टार्गेट केल्यानं आता जम्मू काश्मीरमधील लोकं प्रचंड दहशतीत आहेत.
मारेकऱ्यांचा शोध सुरु
दरम्यान, आता पोलीस आणि सुरक्षा बलाच्या जवानांकडून मारेकरी अतिरेक्यांचा शोध घेतला जातोय. सीसीटीव्ही आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीनं पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जातंय. यासाठी पथकंही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मिरात एका गायिकेचीही अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली ही तिसरी घटना आहे. या वाढत्या घटनानंतर आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तसंच बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मात्र तरिही अतिरेक्यांच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नसल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.