‘ओsss लग्नात गाणारी नाही मी!’ असं म्हणताच अतिरेक्यांनी अमरीनवर गोळ्या झाडल्या
म्मू काश्मिरात 25 मे रोजी रात्री एक हत्याकांड घडलं. अतिरेक्यांनी चदूरा परिसरात अमरीन नावाच्या एका महिलेवर गोळी झाडली होती.
जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir Murder) बडगाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार असलेल्या अमरीन भट्टची (Amarin Bhatt) गोळ्या घालून हत्या केली. या हत्येबाबत (Murder Case) खळबळजनक खुलासा अमरीनच्या बहिणीनं केलाय. डोळ्यांदेखत घडलेला हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच अमरीनच्या बहिणीनं सांगितलाय. अमरीनला भेटायला दोघे जण आले होते. 25 मे रोजी संध्याकाळी घराबाहेर तिला भेटायला दोघे अतिरेकी आले. त्यांनी तिला भेटायला बाहेर बोलावलं. तीन दिवसांसाठी लग्नात गायला ये, असं त्यांनी अमरीनला सांगितलं. पण अमरीन हीनं त्यांना स्पष्ट नकार दिला. मी गाणं गाते, पण लग्नांमध्ये वगैरे गाणी नाही गात, असं म्हणताच अतिरेक्यांनी बंदूक अमरीनच्या दिशेनं ताणली आणि तिच्यावर एकामागून एक गोळ्या झाडल्या. यात अमरीनच्या शरीराच्या आरपार गेल्या. गंभीररीत्या जखमी झालेल्या अमरीनचा उपचारादरम्यान जीव गेला.
दरम्यान, यावेळी अमरीनसोबत एक 10 वर्षांचा चिमुरडाही होता. अमरीनच्या भाच्यालाही या गोळीबारात जखम झाली. त्याच्या खांद्याला गोळी लागली. जखमी झालेला हा 10 वर्षांचा चिमुरडा रुग्णालयात असून त्यांच्यावर तो आयुष्याशी झुंजतोय.
कुटुंब संकटात
अमरीनच्या आई गेल्या अनेक वर्षांपूर्वीच मृ्त्यू झालेला. आईविना वाढलेल्या ही मुलगी आपल्या वडिलांसाठी एका कर्तबगार मुलाप्रमाणेच होते. आपल्या अभिनयातून मिळणाऱ्या पैशांतून ती घर चालवत होती. अमरीनच्या कमाईतून पूर्ण घर चालायचं. पण आता तिचीच हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण कुटुंब संकटांनी घेरलं गेलंय.
हत्याकांडाचं सत्र
युट्युबवर अमरिन एक चॅनल चालवत होती. या यु्ट्युब चॅनेलच्या माध्यमातूनच ती अतिरेक्यांच्या नजरेत आली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. गेल्या काही काळात टीव्ही अभिनेत्रींच्या हत्येचं सत्र अतिरेक्यांनी चालवल्याचं बघायाल मिळालंय. सातत्यानं सुरु असलेल्या सैन्याच्या कारवाईनं अतिरेक्यांचं धाबं दणाणणंय. अशातच दोन दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचीही हत्या केली होती. तसंच या पोलिसाची मुलगीदेखील गोळीबारात जखमी झालेली. तिच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमरीन हत्याकांड प्रकरण काय आहे?
जम्मू काश्मिरात 25 मे रोजी रात्री एक हत्याकांड घडलं. अतिरेक्यांनी चदूरा परिसरात अमरीन नावाच्या एका महिलेवर गोळी झाडली होती. या गंभीरीत्या जखमी झालेल्या अमरीन लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यासोबत असलेल्या 10 वर्षांचा मुलगाही गोळीबारात घायाळ झाला होता. या दोघांवर चदूरा रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, डॉक्टरांनी अमरीनला मृत घोषित केलं. तर 10 वर्षांच्या मुलावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान अमरीनही हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना सुरक्षाबलाच्या जवानांनी शोधून काढत त्यांना यमसदनी धाडलंय. गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत शाहिद मुश्ताक भट आणि फरहान हबीब यांचा खात्मा करण्यात आलाय.