Crime | संपत्तीचा हव्यास, घराचा ताबा मिळावा म्हणून आईचे शव 10 वर्ष फ्रीजमध्येच लपवले!

जपानमध्ये एका महिलेने तब्बल 10 वर्षे आपल्या आईचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटन नुकतीच उघडकीस आली आहे.

Crime | संपत्तीचा हव्यास, घराचा ताबा मिळावा म्हणून आईचे शव 10 वर्ष फ्रीजमध्येच लपवले!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 6:25 PM

मुंबई : जपानमध्ये एका महिलेने तब्बल 10 वर्षे आपल्या आईचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आईच्या संपत्तीवर मालकी हक्क मिळावा म्हणून या महिलेने हे विकृत कृत केल्याचे कळते आहे. आईच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये आपल्याला आरामात राहता यावे, म्हणून मृत आईचे शव  मुलीने फ्रिजमध्ये लपवले होते. एक नव्हेतर तब्बल 10 वर्ष हा मृतदेह तिथेच बंद करून ठेवण्यात आला होता (Japanese women hide mothers death body in fridge for 10 years).

सदर घटना 10 वर्षांनी लोकांसमोर येताच या महिलेने यामागचे कारण सर्वाना सांगितले. आपल्या आईच्या घरातून कोणाही आपल्याला बाहेर घालवून देऊ नये आणि आपल्याला आईसोबत राहता यावे म्हणून तिने असे कृत्य केले आहे.

जपानी माध्यमांनी उघड केली घटना

शनिवारी जपानी माध्यमांनी याबाबत बातमी दिली की, या महिलेने तब्बल एका दशकासाठी आपल्या अपार्टमेंटमधील फ्रिजमध्ये आईचा मृतदेह लपवला होता. योशिनो असे या महिलेचे नाव आहे. योशिनो हिने गेल्या 10 वर्षांपूर्वी हा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवला होता. कारण तिला आईचे घर कधी सोडायचे नव्हते (Japanese women hide mothers death body in fridge for 10 years).

असा झाला खुलासा…

स्थानिक क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आईच्या मृत्यूच्या वेळी ही मुलगी सुमारे 60 वर्षांची होती. तेथे काही कामानिमित्ताने स्थानिक पालिकेची टीम हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील फ्लॅट रिकामी करण्यासाठी त्या घरात पोहोचली तेव्हा सदर घटना उघडकीस आले. अहवालात असे म्हटले आहे की, योशिनोचा भाडे करार पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ही अपार्टमेंट सोडण्यास भाग पाडले गेले होते आणि तेव्हाच या फ्रीजमध्ये  लपवलेल्या मृतदेहाची घटना समोर आली.  क्लीनरच्या मदतीने हा मृतदेह आता बाहेर काढण्यात आला आहे. अहवालानुसार या महिलेच्या मृत्यूची वेळ आणि कारणे अध्याप शोधण्यात आलेली नाहीत.

(Japanese women hide mothers death body in fridge for 10 years)

हेही वाचा :

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.