तो मुलांना बंदूक दाखवून गोळी घालेल म्हणायचा…मग मुलं दागिने चोरायचे, चोरीचा हा प्रकार ऐकून तुम्हाला धक्काच बसेल…
मौजमजा करत भाईगिरी करणाऱ्या आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या अथर्व देशमुख याने गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला धमकी दिली होती.
Nashik Crime News : नाशिकमध्ये चोरीची धक्कादायक (Nashik Crime News) घटना समोर आली आहे. या चोरीच्या घटणेने पोलीस देखील चक्रावून गेले आहे. सुरुवातीला अल्पवयीन मुलाने घरातून दागिने (Jewellery worth ) चोरल्याची बाब समोर आली होती, मात्र त्यानंतर पोलीस तपासात आलेली माहिती खळबळ उडवून देणारी आहे. गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा वापर करून अथर्व देशमुख युवकाने दागिने चोरल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अथर्व देशमुख हा कॉलेजरोड परिसरात भाईगिरी करत असल्याचे समोर आले आहे. भाईगिरी करणाऱ्या अथर्व नामक युवकाने पैसे कमविण्याची नवी शक्कल लढविली होती. मौजमजा करीत अथर्व व्यसनाच्या आहारी गेला होता. आर्थिक परिस्थिति चांगली असणारी अल्पवयीन मुलं तो शोधायचा. त्यांना बंदुकीतून (Gunpoint) गोळी झाडून ठार मारण्याची धमकी द्यायचा, घरातून दागिने चोरी करून तो त्याच्याकडे घेऊन यायला लावायचा. अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मौजमजा करत भाईगिरी करणाऱ्या आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या अथर्व देशमुख याने गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला धमकी दिली होती.
घरातील दागिने चोरी करून आण नाहीतर बंदुकीच्या गोळीने ठार मारेल अशी धमकी देत पाच लाखांचे दागिने आणण्यास भाग पाडले आहेत.
पटेल नामक पालकाने तक्रार दिल्यावरुन पोलीसांनी तपास करत असतांना ही बाब समोर आली आहे. अथर्व याच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
अथर्व देशमुख या युवकाला रोलेट बिंगो या ऑनलाईन खेळाचा नाद आहे, तो व्यसनाच्या देखील आहारी गेल्याचे समोर आले असून तो मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करायचा.
अनेक अल्पवयीन मुलांना त्याने अशा प्रकारची धमकी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यात अनेकांकडून त्याने दागिने घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.