Jhansi Income Tax Raid: 9 kg सोनं, 600 कोटींची रोकड सापडल्यानंतर कर चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची डायरी पाहून इन्कम टॅक्सचे अधिकारी चक्रावले

या कारवाईदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी 600 कोटींपेक्षा अधिक बेनामी मालमत्ता, रोख रक्कम, सोने व करचोरी पकडली आहे. चौकशी दरम्यान हे उद्योगपती, बिल्डर व व्यापाऱ्यांच्या डायऱ्या पाहून इन्कम टॅक्सचे अधिकारे चक्रावले आहेत.  या डायरीत कोट्यावधींच्या बेहिशेबी व्यवहारांची नोंद झाली आहे. यासह 200 कोटींची बनावट बिलं दाखवून 200 कोटींच्या रोकडच देवाण घेवाण झाल्याचे तपासात समोर आले आहे. 

Jhansi Income Tax Raid: 9 kg सोनं, 600 कोटींची रोकड सापडल्यानंतर कर चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची डायरी पाहून इन्कम टॅक्सचे अधिकारी चक्रावले
नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष पक्षाच्या अध्यक्षावर छापेमारीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 9:25 PM

झाशी : आयकर विभागाने झाशीत मोठी कारवाई केली आहे(Jhansi Income Tax Raid). येथील उद्योगपती, बिल्डर व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर सलग पाच दिवस छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. या पाच दिवसांच्या कारवाईत आयकर विभागाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी 600 कोटींपेक्षा अधिक बेनामी मालमत्ता, रोख रक्कम, सोने व करचोरी पकडली आहे. चौकशी दरम्यान हे उद्योगपती, बिल्डर व व्यापाऱ्यांच्या डायऱ्या पाहून इन्कम टॅक्सचे अधिकारे चक्रावले आहेत.  या डायरीत कोट्यावधींच्या बेहिशेबी व्यवहारांची नोंद झाली आहे. यासह 200 कोटींची बनावट बिलं दाखवून 200 कोटींच्या रोकडच देवाण घेवाण झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण कारवाईत आयकर पथकाने उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि घनराम ग्रुपकडून सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येकाने सुमारे दीड कोटी रुपयांची करचोरी केल्याची कबुली दिली असल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले आहे.

डायरीत 300 कोटी रुपयांचा रोख व्यवहाराची नोंद

प्राप्तिकर पथकाने सर्व व्यावसायिक, बिल्डर व व्यापाऱ्यांकडून एक डायरीही जप्त केली आहे. या डायरीत 300 कोटी रुपयांचा रोख व्यवहार आढळून आला आहे. या धाडसत्रादरम्यान 9 किलो सोन्याचे दागिनेही आयकर पथकाच्या हाती लागले आहेत. याशिवाय आयकर पथकाने या सर्व व्यावसायिक, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांमधील सर्वात महत्त्वाचा दुवा सीए दिनेश सेठी यांच्या निवासस्थानावर देखील धाड टाकली.

सीएच्या घरी सापडली महत्वाची कागदपत्रं

या सीएच्या घरातील कपाटात ठेवलेल्या बिल्डर, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी संबंधित फायली आणि महत्त्वाची कागदपत्रेही पथकाने जप्त केली आहेत. घरावर छापा पडला तेव्हा सीए सेठी बाहेर फिरायला गेले होते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेरच गाठून त्यांची वॉरंटवर सही घेतली. घनाराम ग्रुपच्या मालकाला नोएडा येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात 4 दिवस नजरकैदेत ठेवल्याचा दावाही आयकर पथकाने केला आहे.

सीए सेठीच्या घरात सापडलेली सर्व कागदपत्रे आणि फाईल्सची तपासणी केल्यानंतर झाशीमधील आणखी काही लोकं आयकरच्या रडारवर आली आहे. त्यांच्यावरही लवकरच छापे टाकण्यात येणार असल्याचा दावा, एका आयकर अधिकाऱ्याने केला. ही संपूर्ण धाडसत्राचे कनेक्शन  कानपूरमधील एका रुग्णालयाशी जोडले जात आहे. रुग्णालयातील प्राप्तिकर पथकाला 9 कोटी रुपयांच्या बेहिशेबी खात्यांची महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.

सहा महिने वॉच ठेवून टाकली धाड

बेहिशेबी व्यवहार आणि मालमत्तांबाबत माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी तेव्हापासूनच व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, घनराम ग्रुपच्या मालकाचे कार्यालये, निवासस्थाने, हॉटेल्स, शोरूम अशा तीन डझनपेक्षा अधिक ठिकाणी मागील सहा महिन्यांपासून वॉच ठेवून होते. अधिकाऱ्यांनी या सर्व ठिकाणांची रेकी देखील केली होती.

बँकांचे लॉकर्सही सील

आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांची करचोरी, बेनामी मालमत्ता, बेहिशेबी रोकड, सोने असल्याची पुष्टी केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या परवानगीने छापेमारी केली. या व्यापाऱ्यांचे फोन देखील टॅप केले गेले. या सर्व लोकांना आलेले फोन कॉल्स स्वत:च्या सर्विलान्सवर घेत त्यांच्यात झालेली चर्चा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐकली. पाच दिवसांच्या छापामारी कारवाईत आयकर पथकाने खासगी बँकांमधील चौदा लॉकर्सची झडती घेतली. तसेच अनेक लॉकर्सही सील देखील केले आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.