Jharkhand Crime News | माझ्या अस्थी बँक लॉकरमध्ये ठेवा, सासऱ्याच्या विनाशानंतरच विसर्जन करा, बिझनेसमनची आत्महत्या
आपली अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, असे मृत राहुलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी तिथून सर्व काही पाहत राहील. प्रदीपचा नाश झाल्यानंतरच त्याची अस्थिकलश हरिद्वारमध्ये प्रवाहित करावा
रांची : झारखंडमधील जमशेदपूर (Jamshedpur Jharkhand) येथील हॉटेलमधून उडी मारुन आत्महत्या (Suicide) करणाऱ्या व्यावसायिकाचा मृत्यू प्रकरणाचे गूढ व्हॉट्सअॅप व्हिडिओच्या माध्यमातून उलगडले आहे. मरण्यापूर्वी व्यावसायिकाने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला. व्यापारी राहुल अग्रवाल यांनी गुरुवारी संध्याकाळी बिस्तुपूर येथील हॉटेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Crime News) केली होती.
काय आहे प्रकरण?
व्हॉट्सअॅपवर राहुल अग्रवाल यांनी भावाला व्हिडिओ पाठवून मृत्यूचे कारण नमूद केले असून, सासरे, सासू, मेहुणे आणि पत्नी यांच्या छळाला कंटाळून आपण मृत्यूला कवटाळत असल्याचे सांगितले. त्याचे सासरे प्रदीप चुरीवाला हे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. अग्रवाल यांनी व्हिडिओमध्ये आपल्या भावाला सांगितले की, मृत्यूनंतर प्रदीपचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईपर्यंत त्याच्या अस्थीचे हरिद्वारमध्ये विसर्जन करू नये.
अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा
आपली अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, असे मृत राहुलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी तिथून सर्व काही पाहत राहील. प्रदीपचा नाश झाल्यानंतरच त्याची अस्थिकलश हरिद्वारमध्ये प्रवाहित करावा. यासोबतच राहुलने व्हिडिओमध्ये पत्नी आणि मुलांचाही उल्लेख केला आहे. त्याचे पत्नी आणि मुलांवर खूप प्रेम असल्याचे त्याने सांगितले. बायको तशी वाईट नव्हती पण तिच्या आईने तिला वाईट वागायला लावले, असंही तो म्हणतो.
राहुलने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, प्रदीप चुरीवाला पैशासाठी काहीही करू शकतात. प्रदीपला आपल्या मुलीचे लग्न कुणासोबत तरी पैसे घेऊन करायचे आहे, म्हणून तो माझा छळ करत आहे. व्हिडीओमध्ये राहुलने आई-वडील आणि भावाची माफी मागितली आणि म्हटले की, माझ्यामुळे तुम्ही लोकांनी कोर्टात फिरावे असे मला वाटत नाही.
संबंधित बातम्या :
शिवानी, तू खुश रहा, सासुरवाडीहून परतल्यानंतर तरुणाची आत्महत्या, चारपानी सुसाईड नोट
उदयपूरमध्ये पती-पत्नीमधील वादातून तीन मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या
नागपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बेरोजगारीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल