क्रूरतेचा कळस! 35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप, आठ जण कोरोनाग्रस्त, पीडितेलाही संसर्ग

दहा तासांच्या आत 11 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींमध्ये पीडितेच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. (Jharkhand Lady Gang Rape )

क्रूरतेचा कळस! 35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप, आठ जण कोरोनाग्रस्त, पीडितेलाही संसर्ग
बलात्काराच्या आठ आरोपींना कोरोना संसर्ग
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 1:17 PM

रांची : झारखंड जिल्ह्यात वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला. 35 वर्षीय महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे. (Jharkhand Lady Gang Rape by 11 Men Eight found COVID Positive)

झारखंड जिल्ह्यातील पाकुडमध्ये ही घटना घडली. सामूहिक बलात्कारानंतर पीडिता दोन दिवस बेशुद्धावस्थेत होती. महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यासह मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेऊन कुकर्माची माहिती दिली. एसपी मणिलाल मंडल यांच्या टीमने दहा तासांच्या आत 11 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींमध्ये पीडितेच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.

शस्त्राच्या धाकाने महिलेचं अपहरण

पीडित महिला संध्याकाळच्या वेळेस शौच करण्यासाठी चालली होती. यावेळी वाटेत काही युवक मद्यपान करत बसले होते. महिला एकटीच असल्याचं पाहून त्यांनी शस्त्राच्या धाकाने तिचं अपहरण केलं. काही अंतरावर झाडीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आणखी काही नातेवाईकांनाही बोलावून घेतलं. अकरा जणांनी अख्खी रात्र महिलेवर अत्याचार केले.

सकाळच्या वेळेस पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रस्त्यात सोडून आरोपी पसार झाले. महिला कशीबशी आपल्या घरी पोहोचली. घडलेल्या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. दोन दिवस तिची शुद्ध हरपलेलीच होती. नातेवाईकांनी सुरुवातीला तिच्यावर उपचार करुन घेतले. त्यानंतर मुफस्सिल पोलिसात जाऊन गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला.

पाळत ठेवून महिलेवर बलात्कार

पीडित महिला दररोज संध्याकाळी कुठल्या वेळी घराबाहेर पडते, याची माहिती आरोपींना आधीपासूनच होती. ती एकटी जात असल्याचं माहित असल्यामुळे आरोपी सापळा रचून बसले होते. शस्त्र बाळगून आरोपी मद्यपान करत बसले, अशी माहिती पोलिसांनी दिली. एसपी मणिलाल मंडल यांच्या माहितीनुसार पोलिसांनी 10 तासांच्या आत कारवाई करत सर्व आरोपींना जेरबंद केलं.

अकरापैकी एक आरोपी अल्पवयीन

पोलिसांनी एकाच वेळी दहा जणांची धरपकड केली. तर पसार झालेला अकरावा आरोपी अल्पवयीन होता. त्याला नंतर अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत आठ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर पीडितेलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. सर्व आरोपींवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लिट्टीपाडा कोव्हिड-19 मॅनेजमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

(Jharkhand Lady Gang Rape by 11 Men Eight found COVID Positive)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.