बायको आहे का कोण ! स्वत:चचं कुंकू पुसलं, दांडक्याने पतीचं थेट डोकंच फोडलं; कारण ऐकून धडकीच भरेल…
Husband Murder : याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र त्यामागचं कारण ऐकल्यावर पोलिसदेखील हादरले. अशा कारणासाठी कोणी जीव घेतं का असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.
रांची | 5 ऑक्टोबर 2023 : झारखंडमध्ये महिलेने स्वत:च्या हाताने तिचं लग्न संपवलं आणि कुंकूही पुसलं. एका क्षुल्लक कारणावरून पतीशी वाजलं पण त्यानंतर महिलेने तिच्याच पतीची हत्या (murder news) केली. ही घटना झारखंडच्या धनबाद येथील दामोदरपुर डुमरी कुल्ही येथे घडली. स्वत:च्याच नवऱ्याचा जीव घेण्यासारखं एवढं काय बिघडलं होतं, असा सवाल सध्या सर्वांच्याच मनात आहे. मात्र आरोपी महिलेने गुन्हा कबूल करत कारणही सांगितलं, ते ऐकीन सर्वांनाच धडकी भरेल.
पती खर्चासाठी पैसे (पॉकेट मनी ) देत नव्हता. बस, एवढ्याशा मुद्यावरून तिने त्याचा जीवच घेतला. याच मुद्यावरून मंगळवारी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या पत्नीने वादानंतर रात्री पतीच्या डोक्यात दांडक्याने प्रहार करून त्याची हत्या केली. पतीच्या खुनानंतर ती तेथून फरार झाली. बुधवारी सकाळी पीडित इसमा मृतावस्थेत आढल्याने कुटुंबिय, शेजारी-पाजारी हादरले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळ गाठून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला.
ही घटना घडल्यानंतर पतीची हत्या करणारी पत्नी सरस्वती देवी जवळच्या विहिरीत लपलेली आढळली. गावातील एक महिला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपी सरस्वती ही विहीरीच्या आतमध्ये लपून बसल्याचे आढळले. त्यानंतर तिने याबाबत मृताच्या कुटुंबीयांना व पोलिसांना कळवले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आरोपी पत्नी सरस्वती देवी हिला विहिरीतून बाहेर काढले आणि अटक केली.
पोलिसांनी तिला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात नेले. पती तिला खर्चासाठी पैसे देत नव्हता, आणि याच मुद्यावरून त्यांच्याच नेहमी भांडणे होत होती. याच रागातून मी त्याला दांडक्याने मारहाण केली व त्याचा जीव घेतला, असे आरोपी महिलेने कबूल केले. या हत्येमागचं कारण ऐकल्यावर पोलिसदेखील हादरले. अशा कारणासाठी कोणी जीव घेतं का असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.