हळद लागली, वरात आली, सातफेरेही घेतले, तरीही तो कुँवाराच राहिला, असं कसं घडलं?; ‘त्या’ लग्नात नेमकं काय घडलं ?

लग्नानंतर आठवडाभरातच अशी घटना घडली की वराने डोक्याला हातच लावला. जिच्यासोबत नव्या आयुष्याची स्वप्नं पाहिली, तिने केलेल्या एका कृत्यामुळे नवविवाहीत माणूस दु:खात बुडाला.

हळद लागली, वरात आली, सातफेरेही घेतले, तरीही तो कुँवाराच राहिला, असं कसं घडलं?; 'त्या' लग्नात नेमकं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 2:58 PM

जयपूर : आपल्याकडे लग्न (marriage) हे सात जन्माचं नातं मानलं जातं. विवाह हा शुभ असतो, असं मानतात. भारतीय समाजात लग्न हे एखाद्या सणापेक्षा कमी नसतं, पण लग्नाच्या 7 दिवसानंतरही वर अविवाहित राहिल्यास त्या कुटुंबाचे काय झालं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. लग्नानंतर कोणी अविवाहित कसे राहू शकतं ? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल ना. पण असं खरंच झालं आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये (jaipur) ही घटना घडली आहे. लग्नानंतरही तो वर अविवाहितच आहे, आणि अशावेळी काय करावं असा प्रश्न कुटुंबीयांनाही पडला आहे. त्या घरात नेमकं काय झालं ?

प्रत्येकजण लग्नाचे स्वप्न पाहतो आणि लग्नानंतर वधू घरी येते तेव्हा तिला सासरच्या लोकांकडून प्रेम आणि आदर मिळतो. नवराही तिला आनंदी ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. पण जर त्याच नवरीने लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतरच नवऱ्याची फसवणूक केली तर त्याची मन:स्थिती कशी असेल याची कल्पनाही करता येणार नाही. असाच काहीसा प्रकार राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये घडला, जिथे लग्नानंतर अवघ्या आठवडाभरातच नववधू घरात ठेवलेले दागिने आणि रोकड घेऊन पळून गेली.

वधूचा खरा चेहरा आला समोर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपूरच्या विश्वकर्मा नगरमध्ये राहणाऱ्या रामलालचे लग्न पश्चिम बंगालमधील सुष्मिता नावाच्या मुलीशी ठरले होते. लग्नासाठी एजंटने साडेतीन लाख रुपयांची मोठी रक्कमही त्यांच्याकडून घेतली. मोठ्या थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर वधू सासरी आली आणि सर्वांशी छान मिळून-मिसळून वागू लागली. मात्र त्यानंतरच खरा खेल सुरू झाला. लग्नाला अवघा आठवडाही उलटला नाही तोच नववधू अचानक घरातून गायब झाली. एवढंच नव्हे तर घरातून लाखो रुपये किमतीचे दागिने आणि रोकडही गायब झाल्याचे समोर आले.

२३ जून रोजी रामलालचा विवाह सुष्मिता सोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ ती सासरच्या मंडळींसोबत चांगली वागली, नीट राहिली देखील, मात्र आठवड्याभरा नंतर ती अचानक घरातून पळून गेली आणि आजतागायत तिचा पत्ता लागलेला नाही. ती सापडेल, तिचा काही मागमूस लागेल या आशेने पीडित वऱ्हाडी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत, मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

लाखो रुपये घेऊन झाली गायब

लग्नानंतर गायब झालेली सुष्मिता ही दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १८ लाख रुपयांचा माल घेऊन फरार झाली आहे. वराच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कर्ज काढून हे लग्न केले होते, परंतु वधू अशी पळून जाईल हे त्यांना माहीत नव्हते. मात्र वधू अशा प्रकारे पळून गेल्याची ही पहिलीच घटना नाही. राजस्थानमध्ये दरवर्षी अशी अनेक प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये नववधू अशा प्रकारे चोरी करून पळून जातात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.