भयानक ! लहान मुलांनीही सोडत नाहीतर नराधम ! खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या या प्रकरणाने संपूर्ण देशच हादरला आहे. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. मात्र एकीकड याप्रकरणावरून रान पेटेलेल असतानाच दुसरीकडे महिला, तरूणींवर अत्याचार सुरूच आहेत. एवढच नव्हे तर विकृत मानसिकता असलेले नराधम लहान मुलींनाही सोडत नसल्याचे चित्र अनेक वेळा दिसले आहे.

भयानक ! लहान मुलांनीही सोडत नाहीतर नराधम ! खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 8:46 AM

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या या प्रकरणाने संपूर्ण देशच हादरला आहे. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. मात्र एकीकड याप्रकरणावरून रान पेटेलेल असतानाच दुसरीकडे महिला, तरूणींवर अत्याचार सुरूच आहेत. एवढच नव्हे तर विकृत मानसिकता असलेले नराधम लहान मुलींनाही सोडत नसल्याचे चित्र अनेक वेळा दिसले असून मुंबईपालून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्येही अत्यंत भयानक प्रकार उघडकीस आला आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने एका नराधम इसमाने चिमुरड्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे. कल्याण पश्चिमेला घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून त्या चिमुरडीच्या आईच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल पटेल (वय 34) या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत.

खाऊ देतो सांगून नेलं आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या 8 वर्षांची असून ती कल्याण पश्चिम येथे आई-वडिलांसोबत राहते. नराधम आरोपी राहुल पटेल हादेखील त्याच परिसरात राहतो. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घराजवळ खेळत होती. तेव्हाच आरोपी राहुल तिथे आला, आणि त्याने त्या चिमुरडीला दुकानातून खाऊ आणण्याच्या बहाण्याने सोबत नेले. मात्र प्रत्यक्षात दुकानात न जाता तो त्या चिमुरड्या मुलीला तिच्यासोबत त्याच्या चाळीतील एका घरात घेऊन गेला. आणि त्याने तेथे तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्या चिमुरडीने त्याला नकार देत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्याने तिला पकडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या चिमुरडीने आरडाओरड करत स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. मात्र या घटनेबद्दल कोणालाही सांगितलसं, तर जीवानिशी ठार मारेन अशी धमकी त्याने त्या चिमुरडीला दिली. ती मुलगी तेथून थेट घरी आली आणि तिने सर्व प्रकार तिच्य आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने थेट महात्मा फुले पोलिस स्टेशन गाठलं आणि घटनेची माहिती देत तक्रार दाखल केला. महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करत नराधम आरोपी राहुल याला अटक केली असून तपास सुरू केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.