Kalyan Crime : मंदिरात शिरले, देवाला नमस्कार केला, पूजा केली अन् हळूच… भरदिवसा कल्याणमध्ये काय घडलं ?

कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कल्याणमध्ये अशी एक चोरीची घटना घडली आहे, जिथे चोरट्यांनी देवांनाही सोडलं नाही. हो, हे खरं आहे. चोरट्यांनी चक्क देवळात जाऊन तेथेही चोरी केली. कल्याण पूर्व येथील पत्रीपुलापलिकडे रेल्वे समांतर रस्त्यावर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला

Kalyan Crime : मंदिरात शिरले, देवाला नमस्कार केला, पूजा केली अन् हळूच... भरदिवसा कल्याणमध्ये काय घडलं ?
चोरट्यांनी देवळात घुसून आधी दर्शन घेतले नंतर..
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 2:34 PM

कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कल्याणमध्ये अशी एक चोरीची घटना घडली आहे, जिथे चोरट्यांनी देवांनाही सोडलं नाही. हो, हे खरं आहे. चोरट्यांनी चक्क देवळात जाऊन तेथेही चोरी केली. कल्याण पूर्व येथील पत्रीपुलापलिकडे रेल्वे समांतर रस्त्यावर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी काल दुपारी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्यात. हा सर्व प्रकार मंदिर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमकं काय झालं ?

शुक्रवारी दुपारी पावणे दोन ते दोन वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले आहे. दुपारी मंदिर परिसर आणि मंदिरात कोणीही नसल्याची संधी साधत या दोघा चोरट्यांनी ही चोरी केली. दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा देवळात शिरला, त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला. आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धूम ठोकली. या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30 हजार रुपये इतकी आहे.संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे आढळले. त्याबाबत त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता, ही चोरी घडल्याचे दिसून आले. याप्रकरणातील चोरट्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.