Kalyan Crime : नातेवाईकांना कॉल केला, नंतर पत्नीसह मुलालाही संपवलं.. बिझनेसमनच्या घरात मृत्यूचं तांडव

दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरलं. एका बिझनेसमनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या  केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे

Kalyan Crime : नातेवाईकांना कॉल केला, नंतर पत्नीसह मुलालाही संपवलं..  बिझनेसमनच्या घरात मृत्यूचं तांडव
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 10:35 AM

कल्याण | 2 डिसेंबर 2023 : दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरलं. एका बिझनेसमनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या  केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी बिझनेसमन घरातून फरार झाला आहे. दीपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने पत्वी अश्विनी आणि सात वर्षांच्या मुलाचे आयुष्य संपवले.

या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी दीपक गायकवाड याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान ही हत्या नेमकी का झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नातेवाईकांना केला एक कॉल, त्यानंतर घरात जे घडलं…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक गायकवाड हा पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता. त्यांचे कल्याण शहरातच नानूज वर्ल्ड नावाचे खेळण्यांचे दुकान आहे. काल दुपारी दीपक याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता. त्यांच्याशी बराच वेळ फोनवरून बोलणंही झालं. मात्र त्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून, दोघांची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळाने तो घटनास्थळावरून फरार झाला.

घरातील दृश्य पाहून नातेवाईक हादरले

फोन केल्यानंतर दीपकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांचे डोळेच विस्फारले, ते सगळेच हादरून गेले. घरामध्ये गायकवाड याची पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह होता. तर हत्येनंतर दीपक गायकवाड फरार झाला. हादरलेल्या नातेवाईकांनी कसाबसा धीर गोळा करत महात्मा फुले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले . पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

आरोपी दीपक गायकवाड याचे कल्याण शहरात नानूज वर्ल्ड हे महागड्या खेळण्यांचे दुकान आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल उचलून पत्नी आणि मुलाची हत्या का केली हे समजू शकलेले नाही. दीपकने असे का केले ? हे त्याच्या अटकेनंतरच समोर येईल. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र या हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.