संतापजनक ! दोन वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळत होती, नराधमाने तिलाही सोडलं नाही… टिटवाळ्यात चिमुकलीवर अत्याचार !

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणजवळही अशीच एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या त्या चिमुकलीवर नराधम इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संतापजनक ! दोन वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळत होती, नराधमाने तिलाही सोडलं नाही... टिटवाळ्यात चिमुकलीवर अत्याचार !
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 8:12 AM

राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शानसनाकडून आश्वासनं दिली जात आहेत, नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र मुलींवरील, महिलांवरील अत्याचार अजूनही थांबण्याचं काही नाव घेत नाहीयेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, त्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी आंदोलन करत सरकारला धारेवरही धरलं. पण राज्यात अद्यापही असे विकृत नराधम फिरतच आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणजवळही अशीच एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे.

घराबाहेर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला अत्याचाराला बळी पडावं लागलं. अवघ्या दोन वर्षांच्या त्या चिमुकलीवर नराधम इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील टिटवाळा दहागाव परिसरातील संतापजनक घटना आहे. बाहेर खेळणारी ही मुलगी थोड्या वेळाने घरी रडत परत गेली, आई-वडिलांनी रडण्याचं कारण विचारल्यानंतर, भेदरलेल्या त्या चिमुकलीने कसंबसं काय घडलं ते सांगितलं आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

हादरलेल्या पालकांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई करून अत्याचार करणाऱ्या नराधम विकृत आरोपीला अटक केली. याप्रकरणी तपास सुरू आहे.

लपंडाव खेळताना घात झाला, नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून…

जळगावमध्येही अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. तेथे एका 40 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी 11 वर्षांची असून ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत लपंडाव खेळत होती. खेळता खेळता लपायला ती अचानक नराधम इसमाच्या घरात शिरली. तीच संधी साधून आरोपीने घराचा मुख्य दरवाजा लावला, घरातले सगळे दिवे बंद केले आणि त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिने प्रतिकार करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचं तोंड दाबलं. शांत राहिली नाहीस तर तुला जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने तिला दिली.

या अत्याचारामुळे पीडित मुलीला मोठा धक्का बसला. काही दिवसांनी तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि तिच्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. हे सगळं ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकरली, पण त्यांनी या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार कथन करून त्यांनी आरोपी वानखेडे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र गुन्हा घडल्यानंतर संशयत आरोपी हा मुंबईला पळून गेला होता. अखेर पोलिसांनी अथक तपास करून त्याला मुंबईतून अटक केली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.