मुलं दगडाने आंबे पाडत होती, नंतर पोलिसांनी सगळ्यांना घरातून ताब्यात घेतलं, प्रकरण लक्षात आल्यानंतर…
कल्याणमध्ये एक भयानक प्रकरण उजेडात आलं आहे. मुलगा दगडाने आंबे पाडत होता, त्यानंतर काहीवेळाने पोलिस घरी आले आणि मुलाला ताब्यात घेतलं. त्यावेळी मुलाच्या घरी असलेली मंडळी एकदम शॉक झाली, नेमका प्रकार आहे कुणाच्याही लक्षात आला नाही.
सुनील जाधव, कल्याण : कल्याण (kalyan) पश्चिम परिसरात 4 अल्पवयीन मुलांना दगड मारून आंबे पाडण चांगलंच महागात पडलेला आहे. आंबे पाडण्यासाठी झाडावर (Mango tree) मारलेले दगड एका पक्ष कार्यालयांच्या बाहेर उभ्या गाडीवर पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी पोलिसांनी सीसीटिव्हीचा आधार घेतला असल्याचे माहिती मिळाली आहे. ज्यावेळी मुलांना ताब्यात घेतलं त्यावेळी हा नेमका प्रकार काय आहे हे कुणालाचं माहितं नव्हत. त्यामुळे मुलाचे पालक देखील भयभीत झाले होते. आता पोलिस (kalyan police) काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय आहे. त्या कार्यालयलगत असलेल्या आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात आंबे लागलेले आहेत. हे आंबे पाहून परिसरात अल्पवयीन मुलांना राहावलं नाही, त्यानंतर त्यांनी आंबे तोडण्यासाठी या अल्पवयीन मुलांनी झाडावर दगड मारण्याची सुरवात केली, मात्र ही दगडी आंब्याना न लागता भाजप जनसंपर्क कार्यालय बाहेर उभी असलेल्या गाडीवर पडली. त्यावेळी काच फुटल्याचे लक्षात येताच या मुलांनी तेथून पळ काढला. मात्र अचानक गाडीवरती दगडफेक झाल्याने कार्यालयावरती आणि आपल्यावर कोणीतरी हल्ला करत असल्याचा संशय घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले, मग काय पोलिसांनी तपास सुरू करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तपास सुरू केला आहे.
हे सगळं प्रकरण उजेडात आल्यानंतर मुलाच्या पालकांना अधिक त्रास झाला आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्याला सुध्दा अधिक त्रास झाला आहे.