CRIME NEWS : कल्याणच्या दुर्गाडी पुलावर ट्रक चालकाची चाकू मारून हत्या
Kalyan Crime News : भिवंडीहून कल्याणच्या दिशेने खडीने भरलेला ट्रक घेऊन पहाटे चालक निघाला होता. त्यावेळी दोन आरोपींनी चाकूने हल्ला करत चालकाची हत्या केली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण : एक ट्रक (TRUCK) चालकाची दोन आरोपींनी हत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. भोलाकुमार मातोर असे ट्रक चालकाचे नाव असून कल्याण खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. कल्याणच्या ऐतिहासिक अशा दुर्गाडीत पूलावर एका 24 वर्षीय ट्रक चालकाची पहाटे पाच वाजेच्या सुमारास चाकू मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोलाकुमार मातोर (BHOLAKUMAR MATOR) असं चालकाचे नाव आहे. तो भिवंडीहून कल्याणच्या (KALYAN BHIWANDI HIGHWAY) दिशेने खडीने भरलेला ट्रक घेऊन जात होता. कल्याण दुर्गाडीत पूलावर रस्त्यात दोन आरोपीने हत्या केली असून घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलीसानी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशच्या झारखंडमध्ये राहणारा 24 वर्षीय भोलाकुमार मातोर हा मुबईत एक ट्रक चालकाचं काम करतो. आज पहाटे भिवंडी भरून खडीने भरलेला ट्रक कल्याणच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी अचानकपणे पाच साडेपाचच्या दरम्यान ट्रक दुर्गाडी पुलावती आला, त्यावेळी दोन हल्लेखोरांनी ट्रक थांबून त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
तरुणाची हत्या केल्यानंतर मारेकरी तिथून पळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताचं कल्याण बाजारपेठ पोलीस व खडकपाडा पोलीस घटनास्थळी धाव घेतली. चालकाला डॉक्टरांकडे दाखल केलं, परंतु चालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी तीन पथक तयार केली आहेत. खडकपाडा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्या दोघांनी हत्या का केली असावी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. आरोपी ताब्यात आल्यानंतर या प्रकरणातील खरी माहिती मिळेल.